आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरूणीला बांधून रस्त्यावर जनावरांप्रमाणे फिरवले, गुपचुप पाहत राहिले पोलिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरादाबाद- जिल्ह्यात मंगळवारी माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एक महिला एका तरूणेचे हात दोरीने बांधून तिला जनावरांप्रमाणे भररस्त्याने ओढत नेत होती. पीडित तरूणी दोरी सोडवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु, महिला तिला ओढतच नेत होती. विषेश म्हणजे ही घटना पोलिसांसमोर घडली तरी देखील पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यामातून व्हायरल होत आहे....


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- घटना मुरादाबादच्या कटघर येथील पीतलवस्तीमध्यील पोलिस चौकीजवळची आहे. व्हिडिओ स्पष्ट दिसत आहे की, महिला पीडित तरूणाला पोलिसांसमोर दोरीने बांधून रस्त्याने ओढत नेत आहे. एवढेच नाही, तर तरूणीने विरोध केल्यानंतर देखील पोलिस केवळ पाहतच राहिले आणि मुक बनून राहिले.  दुसरीकडे या प्रकरणी पोलिसांशी विचारपूस केली, तेव्हा त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.


आरोपी महिलेला याविषयी विचारले तेव्हा तिने सांगितले की, या तरूणीवर भुताचे सावट आहे आणि ती तिला उपचारासाठी घेऊन जात आहे. तरूणीच्या नातेवाइकांनी सांगितले की, ती रोज कुणाशीतरी मारहाण करते. तरूणीला फरपटत नेणाऱ्या महिलेने ती आपली भाची असल्याचे सांगितले.


पोलिस काय म्हणतात...?
कटघर येथील इस्पेक्टर अजय कुमार गौतम यांनी सांगितले की, प्रकरण माझ्या पर्यंत आले नाही. जर एखादी तक्रार आली, तर प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...