आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरीच्या गळ्यात हात टाकून फोटो काढत होता तरूण, नंतर जे घडले ते झाले कॅमेऱ्यात कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर- येथे मंगळवारी रात्री लग्न समारंभाचे रुपांतर एका युद्धाच्या मैदानात झाले. झाले असे की, वरमाळा टाकण्याच्या विधी दरम्यान एक तरूण सतत नवरीच्या गळ्यात हात टाकून फोटो काढू लगाला. त्यावर आक्षेप घेताच वरपक्ष आणि वधुपक्षाच्या लोकांनी एकमेकांना लाठ्या-काठ्याने आणि खुर्च्या फेकून मारहाण केली. नशेत असलेल्या तरूणांनी नवरदेव-नवरीला देखील सोडले नाही. घटनास्थळी वेळीच दाखल झालेल्या पोलिसांना पाहून गोंधळ घालनारे तरूण मंडपातून पसार झाले. त्यानंतर रात्रभर दोन्ही पक्षांमध्ये पंचायत भरवण्यात आली आणि दोन्ही पक्षात समजूत झाल्यानंतर नवरदेव-नवरीने सात फेरे पुर्ण केले.

  

असे आहे संपूर्ण प्रकरण...
- मिळालेल्या माहितीनुसार, बर्रा येथील बाबूलाल दिवाकर यांची मुलगी पूनमचे लग्न मर्दनपूर येथील नीरजशी होत होते.
- मंगळवारी गाजत वाजत वरात लग्नस्थळी दाखल झाली. लग्न लागल्यानंतर वरमाळा घाल्याण्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर स्टेजवर नवरी आणि नवरदेवाकडील पक्षाच्या लोकांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली. तेवढ्यात पूनमच्या कॉलनीत राहणारा सन्नी आपल्या मित्रांसोबत स्टेजवर आला आणि नवरीच्या गळ्यात हात टाकून, तसेच नवरीला चिपकून फोटो काढू लागला.
- खूप वेळ तो अशीच हरकत करत होता. त्याला असे करण्यास वरपक्षाच्या लोकांनी वरोध केला. हे पाहून पूनमची आई देखील स्टेजवर आली आणि त्याला तेथून जाण्यास सांगू लागली.
- या दरम्यान सन्नीने जो तरूण त्याला नवरिच्या गळ्यात हात टाकण्यास विरोध करत होता, त्याच्या कानशिलात लागवली. यानंतर वरपक्षाच्या लोकांनी सन्नीला ओढत नेले आणि त्याची धुलाई केली.
- नवरी पूनमने जेव्हा सन्नीला मारहाण होताना पाहिले तेव्हा ती स्टेजवरून उतरून त्याला वाचवण्यासाठी पोहोचली. हे पाहून नवरदेव देखील तिथे पोहोचला. यानंतर दोन्ही पक्षात जोरदार वाद सुरू झाला. वाद एवढा वाढला की, दोन्ही पक्षाच्या लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या आणि लाठ्या काठ्याने मारहाण सुरू झाली. एक तास हे युद्ध सुरू होते. दरम्यान गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने याची माहिती पोलिसांना दिली.
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना पाहून गोंधळ घालणारे तरूण फारार झाले. पोलिसांनी दोन्ही पक्षातील लोकांना शांत करून पोलिस ठाण्यात नेले. तेथे रात्रभर पांचायत भरवण्यात आली. त्यानंतर बुधवारी सकाळी दोन्ही पक्षांची समजूत काढल्यानंतर नवरी आणि नवरदेवाने सात फेरे घेतले.


काय म्हणाले पोलिस अधिकारी....
पोलिस अधिकारी भास्कर मिश्रा यांनी सांगितले की, कर्रही गेस्ट हाऊसमद्ये लग्न समारंभ सुरू होता. तेथे फोटो काढण्यावरून वाद झाला होता. आता तो वाद मिटला असून, दोन्ही पक्षांच्या अनुमतीने वधु-वराचे लग्न झाले आहे.


पुढील  स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...