आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • FAKE मानवी बॉम्बची कहाणी: Young Man Reached The Bank As A Terrorist

बँकेत शिरून म्हणाला तरुण, '10 मिनट का टाइम है, पैसा दो, वर्ना सबको उड़ा दूंगा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिजनौर, यूपी - स्वत:ला मानवी बॉम्ब सांगणारा हा युवक एका बँकेत शिरला. पाहता-पाहताच तेथे उपस्थित लोकांमध्ये खळबळ उडाली. तरुणाने मॅनेजरला बॅगमध्ये पैसे ठेवण्यासाठी सांगितले. असे न केल्यास तो विस्फोटाने सर्वांना उडवण्याची धमकी देऊ लागला. तथापि, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याची धरपकड केली. कुटुंबीयांच्या मते, आरोपी तरुण मानसिकदृष्ट्या आजारी आहे.  

 

दहशतीत होते बँकेतील सर्व...
-हा तरुण स्वत:ला मानवी बॉम्ब असल्याचे सांगून चांदपूरच्या एचडीएफसी बँकेत शिरला होता. त्याने पोटावर खोटा बॉम्ब बांधलेला होता. त्याने जेव्हा बॉम्ब दाखवला, तेव्हा लोक प्रचंड भ्यायले. तरुणाचे नाव रोहताश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे कुटुंबीय त्याला मानसिकरीत्या आजारी असल्याचे सांगत आहेत. 
-बराच वेळ बँकेत दहशतीचे वातावरण होते, नंतर कसेबसे पब्लिक आणि पोलिसांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवले.
- बँक मॅनेजर गौरव प्रताप सिंह यांच्या मते, तरुणाने त्यांच्या जवळ येऊन टायमर लावला. त्याने आपल्या कानाला ब्ल्यूटूथ लावून ठेवलेला होता. त्याने धमकी दिली की, 10 मिनिटांत जर बॅगमध्ये पैसे भरले नाही, तर तो सर्वांना बॉम्बने उडवून देईन.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचा व्हिडिओ...  

बातम्या आणखी आहेत...