आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Youths Abduct And Tried To Rape School Girl, Then Made Her Molestation Video In Bihar

Assault: बलात्कार करू शकले नाही नराधम; मग छेडछाडीचा व्हिडिओ केला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नालंदा - एका तरुणीची 3 ते 4 नराधम छेड काढत असल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर पसरवला जात आहे. ज्या व्हिडिओवर लोक संतप्त आहेत, तो बिहारचा आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यात राहणाऱ्या 4 युवकांनी एका तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. तरुणीने आरडा-ओरड केल्याने ते रेप करू शकले नाही. याच रागाच्या भरात त्यांच्यापैकी तिघांनी तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. तसेच चौथा त्या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काढत होता. यानंतर त्यांनी तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. 


शाळेला जाताना केले अपहरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नालंदा जिल्ह्यात घडली आहे. येथे राहणारी एक अल्पवयीन मुलगी शाळेला जात होती. त्याचवेळी 4 जणांनी तिला घेरले आणि उचलून नेले. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. यानंतर तिची छेडछाड करतानाचा एक व्हिडिओ तयार करून तो व्हायरल केला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये 3 युवक आणि व्हिडिओ काढणारी एक व्यक्ती असल्याचे समजते. परंतु, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, यात 3 जण होते. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन जणांचा सध्या शोध घेतला जात आहे. 


एक आरोपी जदयूचा असल्याचे आरोप...
आरोपींपैकी एक राजा रामचे राजकीय कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे गढ असलेल्या नालंदा शहरात घडली. सोबतच राजा राम हा जदयूच्या आईटी सेलचा अध्यक्ष आहे असे सांगितले जात आहे. जदयूने मात्र, त्या आरोपीशी आपल्या पक्षाचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या घटनेचे आणखी फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...