आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडे 10Kg चे दागिने घालून विधानसभेत फिरत होता बाबा, म्हणाला- पुन्हा बनणार रमण सरकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - छत्तीसगड विधानसभेत फिरत असलेला एक बाबा बुधवारी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला. त्याने साडे 10 किलोचे दागिने घातलेले होते. बाबा म्हणाला की, तो डॉ. रमण सिंह मुख्यमंत्री बनावेत हा संकल्प घेऊन बाबा अमरनाथ यात्रेवर जाणार आहे. केशरी वस्त्र, कपाळी कुंकूम आणि विभूती लावलेल्या बाबाकडे विधानसभा व्हिजिटर्स पासही होता. बाबा विचारले की, ते या परिसरात का फिरत आहेत? त्यांनी उत्तर दिले- विधानसभेचा संकल्प करायला आलो आहे. बाबाने स्वत:ला जांजगीर चांपाचा भाजप मंडळ अध्यक्ष असल्याचे सांगितले.

 

स्पीकरनी काढले फोटो:
सदनातही हा मुद्दा काँग्रेस आमदार वृहस्पति सिंह यांनी उचलला. त्यांनी स्पीकर गौरीशंकर अग्रवाल यांना सांगितले की, एक बाबा परिसरात फिरत आहे. स्पीकरने म्हटले- मला माहिती आहे. मी त्याच्यासोबत फोटोसुद्धा काढला आहे. बाबा रामलाल कश्यप जांजगीर जिल्ह्यातील पामगढ़चा रहिवासी आहे. तो 20 वर्षांपासून बाबागिरी करत आहे.


कंटेंट/फोटो : जॉन राजेश पॉल

बातम्या आणखी आहेत...