आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलाच नव्हे, आता पशूही सुरक्षित नाहीत; यूपीच्या बागपतमध्ये श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य, गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागपत (यूपी) - उत्तर प्रदेशात महिलाच नाही, तर आता मुकी जनावरेही सुरक्षित नाहीत. बागपत जिल्ह्यातील सिंघावली अहीर परिसरात बलात्काराचे एक संतापजनक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध श्वानावर अनैसर्गिक कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पीडित श्वान आणि आरोपीचा शोध घेत आहेत.

अपर पोलिस अधीक्षक राजेश कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले की, सिंघावली पोलिसांनी चिरचिटा गावातील कल्लूच्या तक्रारीवरून गावातील बबलू सिंहविरुद्ध श्वानावर रेप केल्याच्या कथित आरोपावरून गुन्हे संख्या-0229/2018, कलम-377, 323 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे.

त्यांनी सांगितले की, ही घटना 3 जुलैची आहे. गुन्हा 6 तारखेला दाखल करण्यात आला आहे. कल्लू आपल्या उसाच्या शेतात गेला होता, तेव्हा आरोपी युवक श्वानाशी अनैसर्गिक कृत्य करताना आढळला. दरम्यान, तक्रारदाराने आपल्या मोबाइलमधून फोटो काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

यावरून नाराज आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी कल्लूच्या घरी येऊन त्याला मारझोड केली. एएसपींनी सांगितले की, पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे, सोबतच श्वानाचाही शोध घेऊन वैद्यकीय चाचणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

याच प्रकारची विचित्र घटना गुजरातच्या वडोदरामधून समोर आली होती. येथे काही वासनांध मिळून अनेक गायींवर अमानवीय कृत्य केले होते. ही घटना वडोदरापासून 30 किमी अंतरावरील पोर गावात घडली होती. या घटनेची माहिती कळताच परिसरातील लोकांमध्ये प्रचंड क्षोभ उसळला होता.

 

 

बातम्या आणखी आहेत...