आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीनेच लावले आईचे दुसरे लग्न, सोशल साइटवर वेगाने व्हायरल होत आहे पोस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संहिता अग्रवाल यांच्या वडिलांच्या निधनानंतर आईच्या आयुष्यात रितेपण भरून राहिले होते. - Divya Marathi
संहिता अग्रवाल यांच्या वडिलांच्या निधनानंतर आईच्या आयुष्यात रितेपण भरून राहिले होते.

जयपूर - राजस्थानच्या राजधानीत 25 वर्षीय एका मुलीने आपल्या विधवा आईचे दुसरे लग्न लावून समाजापुढे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे. तिने प्रश्नोत्तराशी निगडित एका ब्लॉगिंग वेबसाइटवर आपला अनुभव आणि विवाहसोहळ्याचे फोटोही शेअर केले आहेत. हा धाडसी निर्णय घेणारी तरुणीच्या पोस्टला आतापर्यंत 3 लाखाहून जास्त वेळा वाचले गेले आहे. 


#डिप्रेशनमध्ये गेली होती आई
- वास्तविक, गुलाबी शहर जयपूरमध्ये राहणाऱ्या संहिता अग्रवालचे 52 वर्षीय वडील मुकेश गुप्ता यांचा 13 मे 2016 रोज अचानक सायलेंट अटॅकने मृत्यू झाला होता.
- संहिताच्या मते, हा तिच्यासाठी एक मोठा धक्का होता, कारण वडील बिलकुल आजारी नव्हते, कधीच कुणी असा विचारही केला नव्हता.
- या दु:खामुळे संहिताची आई गीता अग्रवाल डिप्रेशन गेल्या आणि नेहमी दु:खी राहू लागल्या.
- दुसरीकडे, मोठ्या बहिणीचे लग्न झालेले होते, यामुळे घरात आई आणि लहान मुलगी संहिताच उरल्या होत्या. 

 

#रात्री टीव्ही सुरू ठेवून झोपण्याची आली वेळ...
- संहिता म्हणाली, ''वडिलांच्या निधनाच्या 6 महिन्यांनंतरही परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. मला ते दिवस आठवतात, जेव्हा मी ऑफिसात जात असताना दु:खात बुडालेली आई घराच्या पायऱ्यांवर बसलेली दिसायची. मला आठवते की, उदास झालेली आई झोपेत ओरडून अचानक उठून मला विचारायची- पप्पा कुठे आहेत? आणि मी त्यांना परत झोपवत होते.''
- संहिता अग्रवालने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगितले की, जयपूरनंतर गुड़गावमध्ये जॉब लागला तेव्हा आई घरात एकटीच राहिली होती.
- त्यांना एकटेपणा एवढा त्रस्त करू लागला की, त्या रात्री टीव्ही लावून झोपायच्या, यामुळे घरात कुणाची तरी सोबत असल्यासारखे वाटायचे. 

 

# मॅट्रिमोनियल साइटवर स्थळ पाहिले
- आईचा एकटेपणा तिच्याकडून पाहावला नाही, यासाठी तिने 2016 मध्ये एका मॅट्रिमोनिय वेबसाइटवर जाऊन आईला न सांगता तिची प्रोफाइल बनवली. यानंतर स्थळं येणे सुरू झाले.
- त्यापैकीच एक 55 वर्षीय गोपाल गुप्ता लग्नासाठी तयार झाले. तथापि, आईला जेव्हा मी हे सांगितले तेव्हा तिने असे करायला नकार दिला होता.
- बांसवाड़ामध्ये रेव्हेन्यू अधिकारी पदावर पदस्थ गोपाल गुप्ता यांच्या पत्नीचे सात वर्षांपूर्वी कँन्सरमुळे मृत्यू झाला होता. यानंतर तेही एकटे पडले होते.

 

#मग अशी पुढे सरकली लग्नाची बोलणी...
- यादरम्यान संहिताची आई गीता यांचे यूटेरसचे मोठे ऑपरेशन झाले, तेव्हा गोपाल यांना याची माहिती मिळाली.
- लग्न ठरले नव्हते तरीही गोपाल गुप्ता हॉस्पिटलमध्ये गीता यांची काळजी घ्यायला पोहोचले.
- यानंतर त्यांच्या नि:स्वार्थ सेवाभावामुळे गीताही प्रभावित झाल्या आणि दोघांनीही लग्नगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला.

 

#नातेवाइकांचा विरोध
- याबाबत गीता यांचे कुटुंबीय आणि नातेवाइकांनी लग्नाला विरोधही केला. ते लग्नात सहभागीसुद्धा झाले नाही.
- परंतु, दोघांनी आपल्या निवडक नाते-संबंधितांच्या उपस्थितीत आर्य समाज मंदिरात लग्न करून दुसऱ्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. 
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, समाज परिवर्तनाचा आदर्श ठरलेल्या आणि वेगाने व्हायरल होत असलेल्या या लग्नाचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...