आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारायपूर - भूत-प्रेत उतरवण्याच्या नावावर एका तरुणीचा उपचार करत असलेल्या मांत्रिकाच्या क्रौर्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो अल्पवयीन मुलीला मारहाण करण्यासह तिच्या प्रायव्हेट पार्टवर पाय ठेवून आक्षेपार्ह कृत्य करत आहे. सोबतच तरुणीचे पूर्ण कुटुंब या घटनेवर हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर धमतरी आणि रायपूर पोलिसांनी याची चौकशी सुरू केली आहे. DivyaMarathi.Com या व्हिडिओची तथ्यात्मक पुष्टि करत नाही.
अशी आहे पूर्ण घटना...
- व्हिडिओची माहिती घेतली असता सूत्रांनुसार कळले की, हा व्हिडिओ छत्तीसगडमधील आहे.
- तथापि, या घटनाक्रमावरून दोन स्थानिक नावे समोर येत आहेत. असे म्हटले जात आहे की, धमतरीच्या नगरी विकास खंडाला लागून असलेले हे एक गाव आहे.
- काही सूत्र या व्हिडिओला रायपुरातील असल्याचे सांगत आहेत. या व्हिडिओतील तरुणीचे कुटुंबीय तिच्यावर भूताने झपाटलेले असल्याने ते उतरवण्यासाठी आणल्याचे दिसतात.
- तरुणीला मांत्रिक बेदम मारताना दिसत असून तो तिच्या पोट व प्रायव्हेट पार्टला पायांनी दाबताना दिसत आहे.
- तिचे केस पकडून तिला फरपटताना दिसत आहे. मध्ये-मध्ये कानात काही मंत्रही म्हणताना दिसत आहे. तरुणी या घटनेनंतर बेशुद्ध होऊ लागल्यावर कुटुंबीयांना वाटले की, तिच्यावरील भूताची छाया उतरली. मग ते सर्व मोठमोठ्याने हसू लागले.
- व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर सोशल मीडियात प्रचंड टीका होत आहे.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या घटनेशी संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.