आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळजबरी करण्यासाठी घरात शिरला पोलिस, महिलेने झाडाला बांधून लाकडाने बदडून काढले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर - येथील एका पोलिस अधिकाऱ्याला झाडाला काढून बदडणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सोमवारी सायंकाळी जवळपास सहा वाजता एका महिलेने तिच्या घरात कोटकपुरा ठाण्यात तैनात असलेला पंजाब होमगार्डचा हवालदार इकबाल सिंह याला झाडाला बांधून चांगला चोप दिला. यावेळी कोणीतरी या प्रकाराचा व्हिडिओ तयार करून व्हायरल केला. 


बळजबरी करण्यासाठी घरात घुसल्याचा आरोप 
महिलेने आरोप केला होता की, पोलिस कर्मचारी तिच्यावर बळजबरी करण्यासाठी घरात घुसला होता. त्याने तसा प्रयत्नही केला. त्यामुळेच तिने त्याला चोप दिला. मात्र हवालदार इकबाल सिंग म्हणाला की, त्याने एका दुकानदाराकडून या महिलेला कपडे धुण्याची मशीन घेऊन दिली होती. पण ती महिला दुकानदाराचे पैसे देत नव्हती. मी पैसे घ्यायला गेलो तर मला घरात ओढले आणि झाडाला बांधून मारहाण करायला सुरुवात केली. महिलेने पोलिसावर डोक्यात वार केल्याचा आरोप केला आहे. 


गावकऱ्यांच्या मदतीने सोडवले 
या प्रकाराबाबत माहिती मिळताच मुख्तियार सिंग हे गावात पोहोचले आणि लोकांच्या मदतीने त्यांनी इकबाल सिंगला सोडवले. मुख्तियार यांनी सांगितले की, ते त्याठिकाणी गेले तेव्हा इकबालला जखमी अवस्थेत झाडाला बांधलेले होते. त्याला गुरू गोविंद सिंग मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. महिलेलाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 


चौकशी करून कारवाई करणार  
डीएसपी (कोटकपुरा) मनिंदर बीर सिंग यांच्यामते गणवेसातील पोलिस कर्मचाऱ्याला झाडाला बांधून मारणे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे गुन्हा दाखल केला जात आहे. तपासानंतर पोलिस दोषींवर कारवाई करेल. 

बातम्या आणखी आहेत...