आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • असा होता आसारामच्या अटकेचा थरार, पोलिसांची एवढी झाली होती दमछाक A To Z Story Of The Day When Asaram Arrested By Police

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असा होता आसारामच्या अटकेचा थरार, पोलिसांची एवढी झाली होती दमछाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाराम यांची एक महिला भक्त. - Divya Marathi
आसाराम यांची एक महिला भक्त.

जोधपूर - देशातील सर्वाधिक चर्चित लैंगिक शोषण प्रकरणांपैकी एक असलेल्या आसाराम केसमध्ये बुधवारी जोधपूर जेलमध्ये कोर्ट आपला निकाल सुनावणार आहे. सुरक्षा पाहून या दिवशी शहरात आसाराम समर्थकांसाठी ‘नो एंट्री’ असेल. शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनवर गुप्तचर संस्था साध्या वेशात नजर ठेवून आहे. सर्व पोलिस स्टेशन्सच्या पथकांनी सोमवारी होटल्सची दर 4 तासांनी तपासणी करून यात थांबलेल्या लोकांची चौकशी केली. तुरुंगाचा एक हॉल कोर्ट रूमसाठी तयार करण्यात आला आहे. 

 

तथापि, आसारामला 31 ऑगस्ट 2013 रोजी इंदूरमधील आश्रमातून ताब्यात घेण्यात आले होते. अटकेआधी जवळपास चार दिवस शहरातील वातावरण तापलेले होते. divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे अटकेच्या दिवसाची पूर्ण कहाणी.

 

अल्पवयीन विद्यार्थीनीवर बलात्काराच्या आरोपात स्वयंघोषित संत आसाराम यांना शोधत 31 ऑगस्ट 2013 रोजी दुपारी जोधपूर पोलिस इंदूरमधील खंडवा रोडवरील आश्रमापर्यंत पोहोचले होते. आश्रमाच्या पदाधिकाराऱ्यांनी आसाराम इंदूरमध्ये नसल्याचे वारंवार पोलिस पथकाला सांगितले. आसाराम देवास जवळील गुप्त ठिकाणी असल्याचे पदाधिकारी सांगत होते. आश्रमात फक्त आसाराम यांचे चिरंजीव नारायण साई आहे असे ते पोलिसांना सांगत होते. आसाराम यांची अटक टाळण्यासाठी दोन लाख भाविकांना इंदूरला येण्याचा निरोप देण्यात आला होता, त्यानुसार खंडवा रोडवरील आश्रमाबाहेर गर्दी जमा होऊ लागली होती. कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी यासाठी सुरक्षा वाढवण्यात आली होती. अतिरिक्त पोलिस बल तैनात करण्यात आले होते. अटकेच्या आधी 27 ऑगस्ट रोजी सकाळी इंदूर पोलिस आश्रमात पोहोचले होते आणि काही वेळाने निघून गेले. त्यानंतर 30 ऑगस्टच्या रात्री आसाराम भोपाळ ते देवास असा प्रवास करत इंदूर आश्रमात आले. येथूनच जोधपूर पोलिसांनी त्यांना मोठ्या यत्नानंतर अटक केली होती.

 

असा होता आसारामच्या अटकेचा थरार

आसाराम त्यांच्या मंचावर बसलेले होते आणि समोर भक्तांचा समुदाय. प्रवचन सुरू होते. तेवढ्यात टीव्ही चॅनलचा पत्रकार आला आणि प्रश्नोत्तरे सुरू झाली.

तुमच्यावर गंभीर आरोप आहे?
- आसाराम म्हणाले सर्व आरोप खोटे आहे. जोधपूरच्या त्या कुटीत काहीच झाले नाही. तिथे बसून जर बोलत बसलो तर लांबपर्यंत आवाज जातो. मी दीड तास तोंड दाबून धरले आणि कोणाला आवाज आला नाही की काही कळाले नाही, असे कसे होऊ शकेल. मी भेटलो असेल, अनेकांना भेटतो, परंतु तसा भेटलो नाही, जसे बोलले जात आहे.

प्रश्न धारदार झाले. तुम्हाला अटक होण्याची शक्यता आहे ?
- नाही. मग म्हणाले, 17 वर्षांसाठी तुरुंगात टाका, खऱ्याला कशाची भीती नाही.

पत्रकाराने विचारले - तुम्ही स्वतःला निर्दोष कसे सिद्ध करणार ?
- भक्तांनी जयघोष सुरू केला. आसाराम म्हणाले, थोडा कॅमेरा तिकडेदेखील फिरवा. मला तर रोज 20 देशातील लोक पाहतात आणि ऐकतात. तेव्हा आसारामचा चेहरा रागाने लाल झाला होता.

पत्रकाराने पुन्हा प्रश्न केला?
- आसाराम म्हणाले - आता जरा भक्तांशी बोला. आणि बोलू लागले - सकाळी उठून पाणी पिणे अत्यंत गरजचे आहे. सकाळी 9 ते 11 दरम्यान भोजन सर्वोत्तम आहे.

पत्रकाराने प्रश्न विचारला - तेव्हा रागावलेले असतानाही हसून आसाराम भक्तांना म्हणाले - रात्री 1 ते 3 दरम्यान जागरण करणे धोकादायक आहे.

पत्रकार म्हणाला - उत्तर तरी द्या. त्याकडे कानाडोळा करत आसाराम परत भक्तांशी संवाद साधू लागले- टेंशन तीन प्रकारचे असते शारीरिक, मानसिक, आणि बौद्धिक.

पत्रकाराने पुन्हा आवाज चढवून प्रश्न विचारला. आसाराम यांनी माईक हातात घेऊन ओम.. ओम.. ओम.. असा जयघोष सुरू केला. त्यांच्या पाठोपाठ भक्तही जयघोष करू लागले.

पत्रकाराने पुन्हा उत्तराची अपेक्षा केली. आसाराम त्यांच्याकडे पाहून फक्त हसत राहिले आणि म्हणाले, हसण्याने आधी सांगितलेले सर्व टेंशन कमी होतात. फ्लाइटची वेळ झाली आहे. चला एअरपोर्टला. आणि आसाराम मुंबई मार्गे सूरतच्या दिशेने निघाले.

 

31 ऑगस्ट रोजी अटकेसाठी पोहोचले जोधपूर पोलिस
जोधपूर पोलिसांचे एक पथक सकाळी खंडवा रोडवरील आश्रमात पोहोचले. सुरुवातीला त्यांना आश्रमात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. मात्र पोलिस आत पोहोचले तेव्हा आसाराम योगा करत होते. त्यानंतर ध्यानमग्न झाले. आश्रमात समन्स पोहोचल्यानंतर दोन तासांत काही नेते आश्रमात पोहोचले. त्यांनी उघड उघड आसाराम यांचा बचाव केला. नेत्यांचे म्हणणे होते की या प्रकरणाचा निष्पक्ष तपास झाला पाहिजे. त्यांना विचारण्यात आले जर तपासात आसाराम दोषी आढळले तर ? तेव्हा नेते मंडळी म्हणाले पहिले तपास तर होऊन जाऊ द्या. नेते दुपारी 12.30 वाजता आश्रमात पोहोचले आणि जवळपास अडीच तास तिथे होते.

 

असा होता घटनाक्रम
> सकाळी सव्वा सात वाजता जोधपूर पोलिसचे सब इन्पेक्टर भंवरसिंह आणि हेडकॉन्स्टेबल सुरेंद्रसिंह नोटीस घेऊन आश्रमात पोहोचले.
> पोलिसांना पाहून सेवेकऱ्यांनी आश्रमाचे दार लावून घेतले आणि त्यांना आत जाण्यापासून रोखले.
> जोधपूर पोलिस जवळपास अर्धा तास आश्रमाच्या बाहेर होते.
> सकाळी 8 वाजता भंवरकुआँ पोलिस स्टेशनचे अधिकारी पथक घेऊन आश्रमजवळ आले.
> काही वेळाने भंवरकुआँ पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी जोधपूर पोलिसांना आतमध्ये पाठवले.
> जवळपास अर्धातास पोलिसांशी कोणीच बोलले नाही. नोटीस घेण्यास कोणीही समोर आले नाही. पोलिस वाट पाहात राहिले.
> बऱ्याच वेळानंतर आसारामच्या सेवेकऱ्यांनी पोलिसांना बापू योगा करत असल्याचे सांगितले.
> सकाळी 9 वाजता एका वकिलाने आसारामच्या वतीने जोधपूर पोलिसांशी चर्चा केली.
> सव्वा नऊ वाजता सचिवाने सांगितले की आसाराम ध्यान करत आहे.
> सकाळी 10 वाजता इंदूर पोलिस आश्रमातून बाहेर पडले. तर, जोधपूर पोलिस तिथेच आसारामची वाटत पाहात बसले होते.
>  दुपारी 12.30 दरम्यान एक स्थानिक आमदार आश्रमात आले.
> दुपारी एक वाजता जोधपूर पोलिसांनी नोटीस सोपवली आणि पोलिस आश्रमाबाहेर पडले.
> दुपारी चार वाजता आसाराम यांनी मीडियाला चर्चेसाठी आत बोलावले.
> आसाराम यांनी निवेदन केल्यानंतर सव्वा चार वाजता एक तरुणी मीडियासमोर आणण्यात आली. तिची ओळख पीडितेची मैत्रीण अशी करून देण्यात आली. ती तरुणी मीडियासमोर आसाराम बापूच्या बाजूने बोलली. 

 

पुढील स्लाइडमध्ये PHOTOS मधून पाहा, त्या दिवसाचा घटनाक्रम... 

बातम्या आणखी आहेत...