आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसारामच्या या फोटोंनी घातला होता धुमाकूळ, जाणून घ्या त्यांचे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसारामला लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक झाल्यानंतर काही फोटो व्हायरल झाले होते. - Divya Marathi
आसारामला लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक झाल्यानंतर काही फोटो व्हायरल झाले होते.

आसारामला लैंगिक शोषणाच्या आरोपात दोषी ठरवण्यात आले आहे. साधारण साडेचार वर्षांपासून जोधपूर तुरुंगात कैदेत असलेल्या आसारामला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे. या दरम्यान सोशल मीडियावर आसारामचे अनेक वादग्रस्त फोटो व्हायरल झाले होते. व्हायरल झालेले सर्व फोटो हे आसारामचेच होते असे नाही. एका फोटोमध्ये आसाराम महिलेसोबत दिसत असल्याचा फोटो सर्वाधिक चर्चेत आला होता. वास्तविक तो आसारामचा फोटो नव्हता. तर त्याच्यासारखाच दिसणाऱ्या एका व्यक्तीचे यातील काही फोटो होते. 

 

आसाराम नाही विराटो होता... 
- व्हायरल झालेल्या फोटोचें सत्य न्यूयॉर्कमधून समोर आले होते. आसाराम सारखी दिसणारी ती व्यक्ती 'विराटो' होती. दावा करण्यात आला होता की हा फोटो आसारमचा नाही तर विराटो आणि त्याच्या पत्नीचा आहे. विराटो हा न्यूयॉर्कमधील एक धर्मगुरु, रेडिओ जॉकी आणि मोटिव्हेटर होता. विराटोचे 2013 मध्ये वयाच्या 74व्या वर्षी निधन झाले होते.  

 

स्वतःला सेक्स गुरु सांगायचा 
- विराटो नावाची ही व्यक्ती स्वतःला सेक्स गुरु असल्याचे सांगायची. विराटो यांचा न्यूयॉर्कमध्ये 'द लव्ह सेंटर' नावाने एक क्लब सुरु होता. तिथे लैंगिक संबंधाबद्दल चर्चा झडत असत. 

महिला फॉलोअर्सची यादी मोठी 
- विराटोच्या फॉलोअर्समध्ये महिलांची संख्या ही सर्वाधिक होती. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की विराटोच्या स्पर्षाने महिलांचे अनेक आजार बरे होत होते.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आसाराम सारखे दिसणारे विराटो यांचे काही निवडक फोटो.. 

बातम्या आणखी आहेत...