आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • भरधाव ट्रकने चिमुकल्यासह 3 जणांना चिरडले Accident Between Truck And Bike, Three Dead, Incident Caught In CCTV

भरधाव ट्रकने चिमुकल्यासह 3 जणांना चिरडले, लोकांनी ड्रायव्हरला बेदम मारून केले पोलिसांच्या स्वाधीन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत - शहरात अवजड वाहनांमुळे दहशतीचे वातावरण आहे. आधीच अवजड आणि त्यात भरधाव असलेल्या वाहनांच्या वेगावर अंकुश लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. याचे उदाहरण बुधवारी दुपारी पाहायला मिळाले, जेव्हा सरथाणामध्ये मुलाच्या अॅडमिशनसाठी आई आपल्या 3 वर्षांच्या मुलाला घेऊन त्याच्या आजोबासोबत जात होती, तेवढ्यात चुकीच्या पद्धतीने वळण घेत ट्रकने 3 जणांना चिरडले. तिघांचाही घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. 

 

ट्रक ड्रायव्हरला बेदम मारहाण…
सरथाणा योगीचौक, योगी दर्शन सोसायटीतील रहिवासी लालजी भाई भगवानभाई रादड़िया सेवानिवृत्त होते. त्यांचा पुतण्या विजय रादड़िया साड़्यांचा व्यवसाय करतो. विजयभाई यांच्या 3 वर्षांच्या मुलाचे शाळेत अॅडमिशन करण्यासाठी ते जात होते. तेव्हा ट्रकने त्यांना चिरडले. ही पूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

 

ड्रायव्हर पळून सोसायटीत लपला
या अपघातानंतर ट्रक ड्राइवर पळून जवळच्याच सोसायटीत लपून बसला. त्याला लोकांनी बाहेर खेचून बेदम मारहाण केली. यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.  

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या भीषण अपघाताचे आणखी Photos...  

बातम्या आणखी आहेत...