आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नेत्याच्या रोड शोसाठी गेली होती श्रीदेवी, चाहत्यांची गर्दी पाहून झाली होती हैरान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरा- बॉलीवुड आभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री निधन झाले. गेल्या वर्षी 13 ऑगस्टला त्यांनी आपला 54वा वाढदिवस साजरा केला होता. 2014 मध्ये उत्तर प्रदेशमधील फतेहपूर सीकरी लोकसभा मतदार संघात रालोदचे उमेदवार अमर सिंह यांच्या प्रचारासाठी श्रीदेवी यांनी रोड शो केला होता. यावेळी त्यांनी ग्लॅमरस तडका दिला होता. त्यांच्यासोबत त्यांचे पति बोनी कपूर देखील होते. अमर सिंह यांच्या रोड शो मध्ये श्रीदेवी यांना पाहण्यासाठी रस्त्यावर दुतर्फा चाहत्यांची गर्दी झाली होती.
 

फक्त एका झलकसाठी तरसत होते चाहते...
- श्रीदेवी रोड शोमध्ये येत असल्याची बातमी ऐकून त्यांची एक झलक पाहण्यासाठी फतेहपूरमध्ये अनेक ठिकाणांहून लोक पोहोचले होते. 
- श्रीदेवी येथे पोहोचल्या तेव्हा त्यांना जवळून पाहण्यासाठी लोक गर्तीतून समोर येण्याचा प्रयत्न करत होते.
- परंतु, सुरक्षा रक्षकांनी चाहत्यांच्या गर्दीला त्यांच्यापाशी येणापासून रोखले होते. 
- या दरम्यान चाहते नाराज होऊ नये म्हणून श्रीदेवी यांनी त्यांना हात वर करून अभिवादन देखील केले होते.


पुढील स्लाइडवर पाहा रोड शो दरम्यानचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...