आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावेरीप्रश्नी अण्णाद्रमुक 2 एप्रिल रोजी करणार उपोषण, तामिळनाडूूत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - कावेरी पाणीवाटपासाठी मंडळ स्थापन करण्यावरून राजकारण वातावरण आणखी तापू लागले असून १ एप्रिल रोजी तामिळनाडूत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सत्ताधारी अण्णाद्रमुकने २ एप्रिलला उपोषणाचा इशारा दिला आहे.  


ताामिळनाडूतील प्रमुख पक्ष असलेल्या द्रमुकने १ एप्रिलला रोजी बैठक आयोजित करून पुढील रणनीती निश्चित केली आहे. पीएमकेच्या कार्यकर्त्यांनीही निदर्शने केली. तामिळनाडू व कर्नाटकमधील कावेरी पाणीवाटपावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळ व कावेरी नियामक समितीची स्थापना करण्याची या पक्षांची मागणी आहे. गुरुवारी त्याबाबतची मुदत संपली.

 

तामिळनाडूत शुक्रवारी कावेरीच्या किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी निदर्शने झाली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.