आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलब्याखाली दबलेली होती आई अन् नवरदेव बनून लग्न मंडपात पोहोचला मुलगा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- कोणाची आई जर ढिगाराखाली दहलेली असेल, तर तो लग्न करण्याचा विचार तरी करू शकेल का? परंतु, विवाह मुहूर्त टळू नये या दबावात येऊन मुलाने आई ढिगाराखाली दबलेली असताना आपल्या एका मित्रासोबत लग्न मंडपात जाऊन विवाहाचे सर्व विधी पुर्ण केले. घाई-घाईत लग्न करून नवरदेव नवरीला घेऊन आपल्या शहरात निघून आला. ब्यावर येथे शुक्रवारी संध्याकाळी एका तरूणाच्या विवाह विधी दरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट झाला, यात संपूर्ण इमारत कोसळली. या दुर्घटनेत नऊ लोकांच्या मृत्यू झाला आहे. नवरदेवाच्या आईसह डझनभर लोक अजूनही कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाराखाली दबलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. 


ब्यावर येथील रहिवाशी हेमंत याचा विवाह जोधपूर येथील तरूणी रितू देवडाशी आज होत होता. दोन्ही पक्षातील लोक विवाहाच्या कामात व्यस्त होते. दरम्यान अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटात संपूर्ण इमारत जमिनदोस्त झाली. या दुर्घटनेत नऊ लोकांच्या मृत्यू झाला, तर अजूनही कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाराखाली डझनभर लोक दबलेले असल्याचे सांगण्यात येत आहे. यात नवरेदवाच्या आईचा देखीस समावेश आहे.


दुर्घटनेनंतर विवाह पूर्ण होइल का नाही याच विवंचनेत सर्वजण होते. लग्नावर संकट कोसळे होते. नवरदेवाच्या घरी आनंदाच्या वातावराणाचे रुपांतर शोकात झाले. रात्री उशीरापर्यंत कुणीही काहीही बोलण्याच्या मानसिकतेत नव्हते. अशीच परिस्थिती वधुपक्षातील लोकांची होती. सकाळपर्यंत सर्वांच्या लक्षात आले होते, की आता हे लग्न लागू शकत नाही.


या दरम्यान नवरदेवाच्या नातेवाइकाने फोन करून वधु रितुचे वडिल लक्ष्मण देवडा यांना लग्न मुहूर्तानुसारच लागेल, तुम्ही लग्नाची तयारी करा अशी सुचना दिली. नवरदेव दुपारी जोधपूरला पोहोचेल असे त्यांनी सांगितले.


एका मित्रासोबत पोहोचला नवरदेव...
दुपारी नवरदेव हेमंत आपल्या एका मित्रासोबत लग्नासाटी जोधपूरला पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद दुख्खात बदललेला होता. साध्या कपड्यात आणि चप्पल घालून मंडपात आलेल्या नवरदेवाकडे प्रत्येक जण कौतूकाने पाहत होता. लोक त्याच्या हिमतीची प्रशंसा करत होते.


हेमंतच्या आईविषयी आद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. ब्यावरमध्ये घटनास्थळी मलबा हटवण्याचे काम सुरू आहे. हेमंत स्वत: काल संध्याकाळापासून आई आणि इतर नातेवाइकांचा शोधकार्य सक्रिय होता. आज (शनिवार) सकाळी त्याच्या वडिलांनी मोठ्या हिमतीने लग्नाचा मुहुर्त टळू नये म्हणून हेमंतला लग्नास तयार करून त्याच्या मित्रांसोबत जोधपूरला पाठवले.

 

दुर्घटनेमुळे आपल्या अनेक नातेवाईकांना गमवलेला नवरदेव काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता, त्याची स्थिती पाहून वधुपक्षाच्या लोकांनी देखील त्याच्या जवळ कुणालाही येऊ दिले नाही. नवरीच्या घरच्यांची स्थिती देखील अशीच होती. त्यांनी घाई-घाईत सायंकाळऐवजी दुपारीच आपल्या निवडक नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्नाचा विधी पूर्ण केला.


नवरीच्या काकाने सांगितले की, आम्ही परिस्थीती समजतो आहोत. या परिस्थितीत आमच्याकडे एकच पर्याय होता, तो म्हणजे विवाह मुहूर्त टळू देणे.


सभी फोटो: एल देव जांगिड
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत अन्य फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...