आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • शेळी चारायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार After Rap Miner Girl In Shock In Uttarakhand Latest News And Updates

शेळी चारायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार, जबर धक्का बसल्याने 2 दिवस जंगलात पडून होती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहरादून - उत्तराखंडच्या कपकोटमधील एका गावात किशोरवयीन मुलीवर बलात्काराची घटना उजेडात आली आहे. तिची हकिगत ऐकून सर्वांचा संताप होत आहे. शेळी चारण्यासाठी जंगलात गेलेल्या किशोरवयीन मुलीवर ओळखीच्याच तरुणाने बलात्कार केला. घटनेनंतर तरुणीला एवढा जबर धक्का बसला की, ती दोन दिवस जंगलातच निपचित पडून होती.

जंगलात गेलेली मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केल्यावर ती जंगलात बेशुद्धावस्थेत आढळली. यानंतर या घटनेला वाचा फुटली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

इयत्ता 11वीमध्ये शिकणारी ही 16 वर्षीय विद्यार्थिनी 18 जून रोजी दररोजच्या सारखे जंगलामध्ये शेळी चारण्यासाठी गेली होती. यादरम्यान 12वीतील 17 वर्षीय विद्यार्थ्याने तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेमुळे भेदरलेली किशोरवयीन मुलगी दोन दिवस घरी आली नाही. गुरुवारी तिचा शोध सुरू असताना कुटुंबीयांना ती जंगलात बेशुद्धावस्थेत आढळली. घरी परतल्यावर मुलीने आपली आपबीती ऐकवली. 

यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित मुलीचे सरकारी जिल्हा रुग्णालयात मेडिकल केले असून त्यात बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिस स्टेशन प्रभारी गोपालराम म्हणाले, बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.   

बातम्या आणखी आहेत...