आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट अटॅकनंतर घरी आणत होते मृतदेह, ब्रेकरमुळे धक्का बसला आणि जिवंत झाली महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण साहित्य मागवले होते. - Divya Marathi
कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारासाठी संपूर्ण साहित्य मागवले होते.

सीकर (कोटा) - येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. मृतदेह हॉस्पिटलमधून अॅम्ब्युलन्समध्ये घरी आणला जात होता. पण घरापासून 5 किमी अंतरावर एका स्पीड ब्रेकरचा जोराचा धक्का लागला आणि अचानक मृत समजून घरी आणत असलेल्या महिलेला खोकला आला. मग काय कुटुंबीय पुन्हा महिलेला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. ही महिला अजूनही जिवंत आहे. 


असे आहे प्रकरण 
सीकरच्या नंछी देवी यांचे पोटात गाठ असल्याने 2 महिन्यांपूर्वी ऑपरेशन झाले होते. 7 दिवसांपूर्वी महिला रूटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्याठिकाणी तिला दाखल करण्यात आले. सोमवारी सकाळी 8 वाजता महिलेला हार्ट अटॅक आला. श्वासोच्छ्वास बंद झाल्याने कुटुंबीयांना वाटले महिलेचा मृत्यू झाला. पण डॉक्टरांचे तसे मत नव्हते. कुटुंबीय महिलेला मृत समजून घरी घेऊन निघाले. पण रस्त्यात स्पीड ब्रेकरच्या झटक्याने महिलेला खोकला आला. त्यामुळे कुटुंबीयांनी महिलेला परत दवाखान्यात नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी काही औषधे देत त्यांना जयपूरला रेफर केले. 


डॉक्टर म्हणाले, कुटुंबीयांनी निष्काळजीपणा केला 
डॉक्टरांनी सांगितले की, महिलेला हार्ट अटॅक आला होता. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवणे गरजेचे होते. कुटुंबीयांनी मात्र डॉक्टरच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून डिस्चार्ज करून घेतला. महिलेचा श्वासोच्छ्वास थांबल्याने कुटुंबीयांनी महिलेला मृत समजले असावे. 

 

बातम्या आणखी आहेत...