आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअर होस्टेस डेथ मिस्ट्रीत खुलासा, मयांकने लपवले होते लग्नापूर्वीचे सत्य, तेच ठरले कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - दक्षिण दिल्लीच्या पंचशील पार्क परिसरात झालेल्या एअरहोस्टेस अनिशियाच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. अनिशियाच्या भावाने आरोप केला आहे की, त्याच्या बहिणीची हत्या करण्यात आली आहे. पती मयांकवर तरुणीचे आई वडील हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार अनिशियाशी लग्न करण्यापूर्वी मयांकचे एक लग्न झालेले होते. त्याबाबत त्याने कोणालाही सांगितले नव्हते. त्याचमुळे दोघांमध्ये कायम वाद व्हायचे. 15 जुलैला अनिशियाचा मृतदेह तिच्या घराच्या खाली आढळला होता. तिने छतावरून उडी मारून आत्महत्या केली असे तिचा पती मयंकचे म्हणणे आहे. 


भावाला केला होता मॅसेज
अनिशियाचा भाऊ करन बत्रा याने सांगितले की, घटनेच्या दिवशी त्याच्या बहिणीने त्याला 2 वाजता मॅसेज केला होता. त्यात लिहिले होते, माझी मदत करा, मयांकने मला खोलीत बंद केले आहे. याला (मयांक) सोडू नका. माझ्या मृत्यूला हाच जबाबदार असेल. त्यानंतर चार वाजता बहिणीचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांना मिळाली. मयांक बहिणीला मारहाण करायचा आणि कोंडून ठेवायचा असा आरोप तिच्या भावाने केला आहे. 

  
पतीलाही केला होता मॅसेज 
पोलिसांच्या मते मृत्यूच्या काहीवेळापूर्वी अनिशियाने मयांकलाही मॅसेज केला होता. त्यावेळी मयांक घरीच होता. मी एक मोठे पाऊल उचलत आहे, असे तिने मॅसेजमध्ये लिहिले होते. त्यानंतर मयांकने अनिशियाला शोधण्याचा प्रयत्न केला. ती सापडली नाही तर तो छतावर गेला. त्याठिकाणीही अनिशिया बेटली नाही. तेव्हा त्याने खाली पाहिले तर ती जखमी अवस्थेत पडलेली होती. 

 
दारु पिऊन भांडायचे नवरा-बायको 
अनिशियाच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, दोघे नवरा बायको नेहमी भांडण करायचे. घटनेच्या दिवशीही मयांक आणि अनिशिया यांच्यात भांडण झाले होते. त्यावेळी दुपारचे दोन वाजत होते. अनिशियाच्या आई वडिलांनी मयांक आणि त्याच्या आई वडिलांवर कौटुंबीक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. अनिशिया बत्रा लुफ्थांसा एअरलाइन्समध्ये एअरहोस्टेस होती. 

बातम्या आणखी आहेत...