आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ज्योतिषाने वर्तवली भविष्यवाणी: ऐश्वर्या रायची कन्या बनणार भारताची पंतप्रधान, 'ही' भाकितेसुद्धा केली Aishwarya Rais Daughter Will Become Prime Minister Of India Says Astrologer Of Hyderabad

ज्योतिष्याची भविष्यवाणी: ऐश्वर्या रायची कन्या बनणार भारताची पंतप्रधान, ट्रम्प पुन्हा सत्तेत येणार!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - एका ज्योतिषाच्या दाव्यावर विश्वास ठेवला तर बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची कन्या आराध्या येणाऱ्या काळात भारताची पंतप्रधान बनू शकते. हैदराबादचे ज्योतिषी डी. ज्ञानेश्वर यांनी रविवारी (25 जून) रोजी एक पत्रकार परिषद घेऊन अनेक भाकिते वर्तवली आहेत.

 

ही भाकिते वर्तवली...

डी. ज्ञानेश्वर यांनी दावा केला आहे की, त्यांनी चिरंजीवी आणि रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली. याशिवाय त्यांनी 2009 मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेसच्या पुनरागमनाची भविष्यवाणी केली होती. या ज्योतिषीने बच्न कुटुंबासाठी सांगितले आहे की, जर आराध्याला देशाची पंतप्रधान बनायचे असेल तर तिचे नाव बदलून रोहिणी ठेवले पाहिजे.

 

मोदी पुन्हा पीएम बनणार, ट्रम्पही पुन्हा सत्तेत येणार!

एका रिपोर्टनुसार, डी. ज्ञानेश्वर यांनी आपल्या भाकितामध्ये दावा केला आहे की, पीएम नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी येतील. डोनाल्ड ट्रम्पही पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील. तर रजनीकांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनतील. या ज्योतिष्याचे मते तामिळनाडूमध्ये मध्यावधी निवडणुका होतील आणि यात रजनीकांत यांचा विजय होईल. डी. ज्ञानेश्वर यांची भविष्यवाणी आहे की, 2024 मध्ये भारत-पाक युद्ध होईल. तसेच ते म्हणाले की, रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानींचे पुत्र आकाश यांनी 2019 मध्ये लग्न केले पाहिजे.


मीडिया आणि ग्लॅमरमध्ये वाढणारी आराध्या बच्चन कुटुंबाची स्टार आहे. महानायक अमिताभ बच्चन म्हणतात की, त्यांची नात आराध्यामुळे ज्यांच्या घरात आनंद ओसंडून वाहतो. 2017 मध्ये आराध्याच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, तिच्या असण्याने घरात प्रसन्नता आहे. घरातील वातावरणात ती उज्ज्वल अन् मनमोहक दिसते. फक्त 6 वर्षांची असूनही ती आमच्याशी ती मोठ्यांप्रमाणे बोलते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

बातम्या आणखी आहेत...