आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटनिवडणूक विजयानंतर अखिलेश म्हणाले- कमळ कोमेजले, अहंकाराला नाकारले आता तरी भाषा बदलेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - फुलपूर आणि गोरखपूरमधील जनतेने भारतीय जनता पक्षाच्या अहंकाराला उत्तर दिले आहे, आता तरी त्यांची भाषा सुधारेल, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. गुरुवारी उत्तर प्रदेशच्या राजधानीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचा अहंकाराला जनतेने नाकारल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच अखिलेश यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, 'ईव्हीएम जर योग्य असते तर एवढा वेळ वाया गेला नसता. समाजवादीच्या उमेदवारांचा आणखी मताधिक्याने विजय झाला असता.' 

 

'समजावादी सर्वांचा सन्मान करतात'
- अखिलेश यादव म्हणाले, समाजवादी सर्वांचा सन्मान करतात. काही जुन्या गोष्टी विसरायच्या असतात. मायावती यांच्यासोबत आमचे संबंध चांगले आहेत. 
- बुधावारी पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अखिलेश यादव मायावतींच्या भेटीसाठी गेले होते. त्यांच्या 18 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील ही त्यांची पहिली भेट होती. 
- अखिलेश म्हणाले, काँग्रेससोबतही आमचे सलोख्याचे संबंध आहेत. राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या. नेताजींनीही (मुलायमसिंह यादव) आशीर्वाद दिले आहेत. 
- अमरसिंह यांच्या प्रश्नावर अखिलेश म्हणाले, ते आमचे अंकल आहेत. ते आम्हाला चांगले ओळखतात आणि आम्ही त्यांना. यापेक्षा अधिक काही बोलण्याचे त्यांनी टाळले. 

 

ऑक्सिजनच्या आभावाने बालकांचा मृत्यू, त्यांच्या मातांचा सभागृहात आवाज होणार 
- गोरखपूर येथून विजयी झालेले प्रवीण निशाद यांच्याबद्दल अखिलेश यादव म्हणाले, की ते सभागृहात त्या मातांचा आवाज होतील ज्यांनी गोरखपूरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आभावी आपली मुलं गमावली आहेत. 
- योगींनी स्वतःच्या मतदारसंघातील या हॉस्पिटलला पैसे दिले नव्हते. 
- अखिलेश यांनी युवक आणि महिलांना सक्रिय होऊन काम करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, 'युवकांनी चांगले काम केले. या पुढील काळात  जर त्यांना ही स्थिती बदलायची असेल तर अधिक काम करावे लागणार आहे. महिलांचीही साथ महत्त्वाची राहाणार आहे. कारण या सरकारने त्यांचीही पेन्शन बंद केली आहे.'
- अखिलेश यादव म्हणाले, उत्तर प्रदेशला आम्ही विकासाच्या मार्गावर आणले होते. रस्ते, मेट्रो आणि हॉस्पिटल सुरु केले. 

 

हेही वाचा.. 

पोटनिवडणूक; अखिलेश यादवांच्या मायाजालात भाजप अडकला, 2 जागा गमावल्या

 

म्ही सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या टोळ्या तयार करत नाही, अखिलेश यांचा टोला

पराभवानंतर शत्रुघ्न सिन्हांचे भाजपला चिमटे, 'मित्रों' चा उल्लेख करत डागली तोफ