आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातील जखमींना अखिलेश यादव यांनी केली मदत, जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी दिली गाडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - आगरा एक्सप्रेस-वे वर झालेल्या एक अपघातानंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ताफा थांबवून जखमींना मदत केली. अपघातात तीन भाविक गंभीर जखमी झाले होते. अखिलेश यादव यांनी त्यांची विचारपूस केली नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी ताफ्यातील एक गाडीही त्यांना दिली. 


अखिलेश यादव यांचा ताफा उन्नाव जवळच्या हसनगंजपासून जात होता. त्याचवेळी त्यांना रस्त्यावर एक गाडी पलटी झालेली दिसली. अपघातातील काही जखमीही रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. हे पाहून अखिलेश यांना ताफा थांबवला आणि ते थेट त्या अपघातग्रस्तांची चौकशी करायला पोहोचले. अखिलेश यांनी सुरक्षारक्षकांच्या मदतीने सर्वांना उठवले आणि त्यांना लगेचच लखनऊ ट्रॉमा सेंटरला पाठवण्याची व्यवस्था केली. त्यासाठी ताफ्यातील एक गाडीही अखिलेश यांनी त्यांना दिली. 


रस्यावर अचानक आलेल्या एका जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे अखिलेश यांना समजले. त्यानंतर त्यांनी ट्वीटरवर फोटो पोस्ट केले. सरकारने भटक्या जनावरांची व्यवस्था करायला हवी असेही यावेळी अखिलेश यांनी ट्वीट केले. 

बातम्या आणखी आहेत...