आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: दारूच्या गुत्त्यावर 500 रुपयांत विकली बायको, दारुड्या नवऱ्याला चुकवायची होती उधारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - सात जन्मांची साथ देण्याचे वचन देणाऱ्या पतीने जर असे कृत्य केले, तर यापेक्षा दुसरे काहीच वाईट असू शकत नाही. सुदामा देवीला तिच्या पतीनेच दारूच्या नशेत फक्त 500 रुपयांत विकले. गोंधळ माजल्यावर गावकऱ्यांनी जाऊन तिची दारूच्या अड्ड्यावरून सुटका केली. यानंतर सुदामाने देवीने गावातील इतर कोणत्याही महिलेवर असा प्रसंग गुदरू नये म्हणून आंदोलनच छेडले. ही घटना शेखपुरा प्रखंडमधील वीरपूर गावातील आहे. दररोज घरातील काही ना काही सामान विकून पती दारू पिऊन यायचा. त्याला रोखल्यावर बेदम मारहाण करायचा. यामुळे त्रस्त होऊन एका दिवशी सुदामा तिच्या वडिलांच्या घरी निघून गेली. परंतु घरातील सर्व सामान विकून झाले, तेव्हा तिचा पती तिला घेण्यासाठी गेला. नवऱ्याला सोडून आली म्हणून लोकंही टोमणे मारत होते, यामुळे त्रस्त होऊन सुदामा परत नांदायला आली.

 

पतीचे बदलले नाही वागणे
पतीने घरातील सर्व सामान विक्री झाल्यानंतरही दारू पिणे काही सोडले नाही. बायकोला घरी आणल्या बरोबर त्याने पुन्हा दारूची तलब लागल्याचे सांगितले. 7 मुलांचे पोट भरणे वरचेवर अवघड होऊन बसले. सुदामा कशीबशी मजुरी करून घर चालवत होती. एका दिवशी पती घरी परतला नाही. त्याला शोधण्यासाठी ती दारूच्या अड्ड्याजवळ गेली. दारूची उधारी झाल्याने दारू दुकानदाराने त्याला बांधून ठेवले होते. सुदामा दारूच्या गुत्त्यावर पोहोचताच तिच्या नवऱ्याने तिला फक्त 500 रुपयांत विकले. अन् स्वत: त्यांच्या तावडीतून सुटून पळून गेला.

 

सुदामाच्या आयुष्याला मिळाली कलाटणी
दारू दुकानदाराला नवऱ्याने विकल्यानंतर तिच्या आयुष्यात मोठा बदल झाला. त्याच दिवशी तिने मनाशी निश्चय केला की, आता दारू हद्दपार करूनच राहीन. गुलाब जीविका स्वयं सहायता समूहाशी ती जोडली आणि तिने आंदोलनाला सुरुवात केली. यादरम्यान दारूबंदीची घोषणा झाली. तिने पूर्ण ताकदीने अभियान चालवले. परिस्थिती अशी आहे की, आज गावात कोणीही दारू पित नाही.

 

दारूच्या नशेत काढली 40 वर्षे
शेखपुरामधील बेलाऊ गावाच्या कांती देवींचे लग्न फक्त 15 वर्षे वयात झाले होते. कुटुंबीयांनी ज्याच्याशी त्यांचे लग्न लावले, तो दारुडा निघाला. नवरा कामधंदा न करता फक्त दारूच प्यायचा. घरकाम आणि घर चालवण्यासाठी बाहेरही कांतीदेवीलाच काम करावे लागायचे. असेच तब्बल 40 वर्षे सुरू होते. कृष्ण जीविका स्वयं सहायता समूहाची सदस्या बनून तिने दारूबंदीची विरुद्ध रणशिंग फुंकले. तिच्याच मोहिमेचा परिणाम असा झाला की, तिच्या पतीने व इतर दारुड्यांनी तिच्या आंदोलना कडाडून विरोध केला. परंतु, ती थकली नाही, हारही मानली नाही. जेव्हा सरकारने दारूबंदीची घोषणा केली, तेव्हा कांतीने सर्व शक्तिनिशी मोहीम चालवली. आता तिचा पतीच काय, गावातील एकही माणूस दारूला हात लावत नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...