आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! TVच्या रिमोटमध्ये होऊ शकतो ब्लास्ट, 11 वर्षीय मुलगा गंभीर, तज्ज्ञांनी सांगितले कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोध्रा - गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील कणजरामध्ये टीव्हीच्या रिमोटचा  ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. 11 वर्षीय मुलगा टीव्ही पाहत होता. त्याच्या हाती रिमोट होता. तेवढ्यात रिमोटमध्ये असा ब्लास्ट झाला की, मुलगा रक्तबंबाळ झाला. हात-पाय, पोटासहित डोळ्यांमध्ये ब्लास्टमुळे निघालेले कण गेले. ताबडतोब मुलाच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागले.

 

सुदैवाने, बालकाच्या डोळे पूर्ववत करण्यात डॉक्टरांना यश आले. त्याला पुन्हा दिसू लागले. या घटनेनंतर प्रश्न उभा राहतोय की, अखेर टीव्हीच्या रिमोटमध्ये विस्फोट कसा झाला? मोबाइलची बॅटरी ब्लास्ट होणे तर सर्वसाधारण गोष्ट आहे, परंतु टीव्ही रिमोट ब्लास्ट होण्याची घटना अतिदुर्मिळ आहे. यामुळे आम्ही एक्रोपोलिस इन्स्टिट्यूट (इंदूर) चे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे प्रोफेसर नीलेश दुबे यांच्या हे कसे शक्य आहे याची माहिती घेतली, तसेच या धोक्यापासून कसा बचाव करावा हेही त्यांनी सांगितले.

 

रिमोटच्या सेलमध्ये का होतो ब्लास्ट?

सेल लिमिटेड करंट ड्रॉ करतो, परंतु अनेकदा सर्किटमध्ये प्रॉब्लेम झाल्याने जास्त करंट निघू लागतो. जास्त करंट निघाल्याने सर्किटचे रेजिस्टन्स कमी होते. रेजिस्टन्स कमी झाल्याने सेलचे अंतर्गत तापमान वाढते. असे सेलमध्ये असलेल्या केमिकल्समुळे होते. सेल पूर्णपणे बंद असतो. मग अशा वेळी तापमान वाढल्यावर ब्लास्ट होऊ शकतो. असेच मोबाइल फोनच्या बॅटरीबाबतही होते.
 

सर्किटमध्ये प्रॉब्लेम का येतो?
सेलचे इंटरनल कम्पोनन्ट शॉर्ट झाल्याने त्याचे रेजिस्टन्स कमी होते. रेजिस्टन्स जेवढे कमी होईल, करंट फ्लो तेवढा जास्त वाढेल. रेजिस्टन्स कमी झाल्याने हाय अमाउंटमध्ये करंट रिलीज होऊ लागतो.


बचासाठी या 2 गोष्टी लक्षात ठेवा..
- लोकल कंपन्यांच्या सेलमध्ये सर्किट ऑथेंटिक नसते. सर्किट ऑथेंटिक नसल्यानेच रिमोटमध्ये ब्लास्ट होतो. यामुळे कधीही लोकल कंपनीचा रिमोट खरेदी करू नका. 

- लोकल कंपनीचा सेलही कधीच विकत घेऊ नका. तो दीर्घकाळ टिकतही नाही शिवाय जीवघेणा ठरू शकतो.

 
क्वालिटी चेक होत नाही
- लोकल कंपन्यांच्या सेल आणि रिमोट्सना स्वस्तात तयार केले जाते, यामुळे त्यांचे क्वालिटी चेक केले जात नाही.
- स्टँडर्ड कंपन्यांचे सेल आणि रिमोट क्वालिटी चेक केल्यानंतरच मार्केटमध्ये येतात. यामध्ये धोका कमी असतो.

 
चाइनामाल थोपला जातोय ग्राहकांवर
- चाइनामधून मोठ्या प्रमाणात लोकल कंपन्यांच्या वस्तू आयात केल्या जातात.
- त्यांना स्वस्त मटेरियलने तयार केले जाते. कोणताही क्वालिटी चेकही होत नाही. यामुळेच त्यांची किंमत खूप कमी होते.
- स्वस्तच्या नादात असे प्रॉडक्ट्स विकत घेणे टाळा. वेळीच सावध व्हा!

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भीषण घटनेचे आणखी Photos... 

 

 

बातम्या आणखी आहेत...