आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमालयातील व्हायाग्रा सोन्यापेक्षाही महाग, एका किलोची किंमत 60 लाखांहून जास्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - यारसागुम्‍बा म्हणजेच उन्हाळी गवत. ही एक प्रकारची बुरशीच आहे. ही सोन्यापेक्षाही महागडी आहे. 1 किलो यारसागुम्‍बाची किंमत तब्बल 1 लाख डॉलर म्हणजेच जवळजवळ 65 लाख रुपये आहे. याला हिमालयातील व्हायाग्राही म्हटले जाते. लोक मानतात की, यामुळे अस्‍थमा, कॅन्सर आणि विशेषकरून मर्दाना कमजोरीमध्ये फायदा होतो.

 

> यारसागुम्‍बा फक्त हिमालय आणि तिबेटियन पठारावर 3000 से 5000 मीटर उंचीवर आढळते. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, दरवर्षी मे ते जून महिन्यात नेपाळचे हजारो लोक डोंगरांवर जातात. ते सर्व यारसागुम्‍बाचा शोध घेतात. त्यांना 3000 मीटर उंचीवर कॅम्प करून राहावे लागते. 5 वर्षांपासून यारसागुम्बाचा व्यापार करणारे कर्मा लांबा सांगतात की, अतिदूर प्रदेशातून गोरखा, धाधिंग, लामजुंग जिल्ह्यातूनही लोक येथे यारसागुम्बाचा शोध घेण्यासाठी येतात.

 
खूप कठीण जीवन जगतात यारसागुम्‍बा शोधणारे लोक
> यारसागुम्‍बाच्या शोधासाठी आलेले लोक दोन महिने खूप कठीण जीवन जगतात. ते टेंटमध्ये राहतात. एक तरुण दांपत्य येथे 3 वर्षांपासून येत आहे. ते म्हणतात की, पहिल्या वर्षी आम्हाला एकही यारसागुम्बा मिळाला नाही. मग आम्ही त्यांची ओळख पटवणे शिकले. आता आम्ही सहजरीत्या दररोज 10 ते 20 यारसागुम्‍बा शोधतो. सुशीला आणि त्यांच्या पतीची मे आणि जून महिन्यात दररोज अशीच दिनचर्या असते. यारसामगुम्बाच्या बदल्यात जो पैसा त्यांना मिळतो त्याच्या साहाय्याने सहजरीत्या ते अर्धे वर्षे काढतात. गतवर्षी त्यांनी 2000 डॉलर कमावले होते. या तऱ्हेने ते दोनच महिन्यात एवढे कमावतात जेवढे 6 महिने इतर कामे करून कमाऊ शकतात.

 

यारसागुम्‍बा दुर्मिळ होत चाललंय
वाढलेली मागणी आणि हवामानातील बदलांचा परिणाम होऊन यारसागुम्‍बाची उपलब्‍धता वरचेवर कमी होत आहे. नेपाळच्या मनांग परिसरात 15 वर्षांपासून यारसागुम्बा शोधणाऱ्या सीता गुरुंग सांगतात की, आधी मी दरदिवशी 100 यारसागुम्बा सहज शोधायचे, परंतु आता दिवसभरात मुश्किलीने 10 ते 20च मिळतात. तज्ज्ञ सांगतात की, जास्त मागणी आणि हवामानातील बदलांमुळे यारसागुम्बाच्या उपलब्धतेत कमतरता येत आहे. सीता सांगतात की, जेव्हा मला दररोज 100 यारसागुम्बा मिळायचे तेव्हा किमती खूप कमी होत्या. आता जेव्हा किमती वाढल्या आहेत, तेव्हा यारसागुम्बा दुर्मिळ होत चाललाय.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, हिमालयीन व्हायाग्रावर सरकारला द्यावी लागते रॉयल्टी.. 

 

बातम्या आणखी आहेत...