आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाेंदूबाबांच्या यादीत चक्रपाणी, कृष्णम‌्; अखिल भारतीय अाखाडा परिषदेची भाेंदूबाबांची तिसरी यादी जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित फोटो. - Divya Marathi
संग्रहित फोटो.

अलाहाबाद- अखिल भारतीय अाखाडा परिषदेने शुक्रवारी भाेंदूबाबांची तिसरी यादी जाहीर केली. त्यात अखत्रल भारत हिंदू महासभेचे प्रमुख चक्रपाणी महाराज व श्री कल्की फाउंडेशनचे संस्थापक व काॅंग्रेसचे नेता अाचार्य प्रमाेद कृष्णम यांचा समावेश अाहे. दरम्यान, साधू-संतांची प्रसिद्ध संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने २०१९ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर बहिष्कार घातला आहे. परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराजांनी येथील पंचायती आखाडा बैठकीत सांगितले की, सरकारकडून संतांचा अवमान केला जात आहे. आम्ही तो कदापि सहन करणार नाही. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे २०१६ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याप्रमाणेच अलाहाबादेत व्यवस्था व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यावर कारवाई झालेली नाही. फक्त आश्वासने दिली जात आहेत, त्यामुळे हा निर्णय घेण्यात अाल्याचे महासभेने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...