आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगींच्या सचिवावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा व्यवसायिक पोलिसांच्या ताब्यात, CMचे चौकशीचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री योगींच्या सचिवावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा व्यावसायिक पोलिसांच्या ताब्यात. - Divya Marathi
मुख्यमंत्री योगींच्या सचिवावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारा व्यावसायिक पोलिसांच्या ताब्यात.

लखनऊ - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मुख्य सचिव शशि प्रकाश गोयल यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या व्यापाऱ्याला पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. लखनऊचे पोलिस अधीक्षक दीपक कुमार यांनी सांगितले, की भाजपच्या तक्रारीवरुन हजरतगंज पोलिसांनी व्यावसायिक अभिषेक गुप्ताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. भाजपने गुरुवारी उशिरा रात्री व्यापाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्री योगींनीही या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. 

 

राज्यपालांनी लिहिले योगींना पत्र 
- मुख्यमंत्री कार्यालयातील या भ्रष्टाचार प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर राज्यपाल राम नाईक यांनी योगींना एक पत्र लिहिले आहे. 
पत्रात म्हटले, की मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव शशि प्रकाश गोयल यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपींची चौकशी झाली पाहिजे. 
- मुख्यमंत्री योगी सरकारवर हा पहिला भ्रष्टाचाराचा आरोप असून थेट मुख्यमंत्र्यांच्या सचिवांवर आरोप करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...