आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनबादच्या मनपा इमारतीत चेटकीणची दहशत; प्रशासनाने पुरावा म्हणून जारी केला हा PHOTO

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धनबाद - झारखंडच्या धनबाद महानगर पालिकेतील कर्मचारी चेटकिणीने भयभीत आहेत. ते आपल्या कार्यालयात काम करण्यास तयार नाहीत. या कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चेटकीणीला कॅप्चर केल्याचा दावा केला. त्यांनी एक फोटो सुद्धा जारी केला. त्यामध्ये एक कथित चेटकीण इमारतीच्या पायऱ्यांवर बसलेली आहे. संध्याकाळ होताच ही 'चेटकीण' याच ठिकाणी येऊन बसते आणि कार्यालयात सुद्धा फिरते. ही कथित भूतबाधा दूर करण्यासाठी येथील कर्मचारी महामृत्यूंजय जाप करण्याच्या तयारीत आहेत. 


अधिकारी सुद्धा घाबरतात...
- केवळ कर्मचारीच नव्हे, तर मनपा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्याला या चेटकिणीची भीती वाटत असल्याचे सांगितले. ही गोष्ट महापौरांपर्यंत पोहोचली आहे. उप-महापौरांचे प्रतिनिधी राज आनंद यांनी सुद्धा इमारतीमध्ये आपल्याला भूत दिसल्याचे म्हटले आहे. 
- त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मनपा प्रशासन ही भूतबाधा दूर करण्यासाठी इमारतीमध्ये लवकरच महामृत्यूंजय यज्ञ करणार आहेत. लवकरच यासाठी पंडित बोलावले जातील. सध्या खरे काय हे कुणालाच माहिती नाही. तरीही संपूर्ण मनपा प्रशासनात भूताची चर्चा सुरू असल्याने सगळेच भयभीत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...