आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींचे राजकारण लोकशाहीला धरून नाही, मोदींच्या भाषणात निर्माण केले अडथळे - शहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत शुक्रवारी अमित शहा म्हणाले की, राहुल गांधींचे राजकारण लोकशाहीला धरून नाही. त्यामुळेच  सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात अडथळे निर्माण करण्यात आले. संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी ही माहिती दिली. 7 फेब्रुवारीला मोदींच्या राज्यसभेतील भाषणादरम्यान काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी जोराने हसल्या होत्या. त्यानंतर मोदी म्हणाले होते, रामायण मालिकेनंतर प्रथमच अशे हास्य ऐकण्याचे सौभाग्य लाभले आहे. 


राफेल डीलबाबत सर्व सांगितले 
- शहा यांच्या हवाल्याने अनंत कुमार म्हणाले की, सरकारने राफेल डीलमधील महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. आम्ही याबाबत पुढे आणखी बरेच काही सांगू. पण प्रत्येक विषयावर चर्चा किती शक्य आहे हे ठरवावे लागेल. 
- गुरुवारी अरुण जेटलींनी संसदेत वक्तव्य केले होते की, प्रणब मुखर्जी म्हटले होते, राफेल डीलबाबत संसदेत चर्चा करणे योग्य ठरणार नाही. गोपनीयता टिकवणेही गरजेचे असते. याबाबत प्रणव मुखर्जी यांच्याकडून राहुल गांधींनी काहीतरी शिकावे. 


राहुल ने ट्विटर पर राफेल डील निशाना साधा
- राहुल यांनी गुरुवारी ट्वीटरवर राफेल डीलबाबत प्रश्न विचारला. संरक्षण मंत्र्यांना त्यांचे वक्तव्य का बदलावे लागले. त्या म्हणाल्या होत्या की, मी नोव्हेंबर 2017 मध्ये राफेल फायटर प्लेनची किंमत सांगेल. पण 2018 मध्येही त्यांनी किंमत सांगता आली नाही. त्याचे कारण काय?
- राहुल गांधींनी चार ऑप्शनही दिले - a)करप्शन b)त्यांना मोदींना वाचवायचे आहे c)मोदींच्या मित्रांना वाचवायचे आहे d)वरीलपैकी सर्व 
- 7 फेब्रुवारीला राहुल गांधींनी राफेल डीलवर कविता लिहिली होती.. 
बहुत लम्बी थी साहेब की बात
सदन में दिन को बता दिया रात
अपनी नाकामियों पर डाले पर्दे
अफसोस भाषण से गायब थे देश के मुद्दे
प्रधानमंत्रीजी चुप्पी कब तोड़ेंगे

 

 

बातम्या आणखी आहेत...