आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानॅशनल डेस्क - सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे एवढे प्रभावित झाले की, त्यांनी त्या फोटोमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीवर पैसे इन्व्हेस्ट करण्याची योजना बनवली. वास्तविक फोटो एका चांभाराचा आहे. यात तो रोडच्या कडेला आपली दुकान लावलेले दिसून येत आहे. त्याच्या मागे एक पोस्ट लागलेले आहे, ज्यात लिहिले आहे की, "जखमी जूतों का अस्पताल". यापुढे लिहिले आहे- डॉक्टर नरसीराम. हे पाहून आनंद महिंद्रा एवढे प्रभावित झाले की, फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांनी शेअर केला.
गुंतवणूक करण्याची तयार आहेत महिंद्रा
आनंद महिंद्रा यांनी फोटो शेअर करत लिहिले आहे की, "मला हा फोटो व्हॉट्सअॅपवर भेटला. मला माहिती नव्हते की, हे कोण आहेत आणि कुठे राहतात. परंतु जर कोणी याचा शोध घेतला आणि हे जर सध्याही काम करत असतील तर मी या स्टार्टअपमध्ये छोटीशी गुंतवणूक करू इच्छितो."
पोस्टरमध्ये काय लिहिले आहे?
पोस्टरमध्ये लिहिलेला पूर्ण मजकूर चपला-बुटांच्या रुग्णालयाच्या आधारे लिहिण्यात आला आहे. यात ओपीडी, लंचची वेळ, हॉस्पिटल उघडण्याची वेळ, सर्वकाही लिहिण्यात आले आहे. पोस्टरमध्ये हेही लिहिले आहे की, बुटांवर जर्मन पद्धतीने उपचार केले जातात.
पुढच्या स्लाइडवर पाहा, व्हायरल झालेला पूर्ण फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.