आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्‍या माजी मुख्‍यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. अानंदीबेन पटेल मध्य प्रदेशच्या दुसऱ्या महिला राज्यपाल ठरल्या. यापूर्वी सरला ग्रेवाल यांनी मार्च १९८९ ते फेब्रुवारी १९९० दरम्यान हे पद सांभाळले हाेते. पटेल यांच्या निवडीत लाेकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे मानले जाते. मध्य प्रदेशात या वर्षी हाेणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अाेबीसी व पाटीदार नेत्या पटेल यांना राज्यपालपदी संधी देण्यात अाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा अाहे.

बातम्या आणखी आहेत...