आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानींच्या मुलासोबत या मुलीचा फोटो झाला व्हायरल, कोण आहे ही मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनंत अंबानीसोबत राधिका मर्चंट. - Divya Marathi
अनंत अंबानीसोबत राधिका मर्चंट.

मुंबई - मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अचानक चर्चेत आला आहे. राधिका मर्चंट नावाच्या मुलीसोबतचा अनंतचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा आहे. आम्ही रिलायन्स जिओचे प्रवक्ते संजय पांडे यांच्याकडे या व्हायरल बातमीचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी ही फेक न्यूज असल्याचे म्हटले. त्यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की राधिका आणि अनंत हे दोघे एकमेकांना ओळखतात, एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अनंतच्या साखरपुड्याची बातमी भलेही फेक असेल मात्र राधिका कोण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सकता आहे. 

 

कोण आहे राधिका मर्चंट? 
- मुकेश अंबानींची मुलगी ईशा हिचा गेल्या आठवड्यात पीरामल ग्रुपचे मालक अजय पीरामल यांचा मुलगा आनंदसोबत साखरपुडा झाला. त्याची मुकेश अंबानी यांनी अँटिलिया येथे लॅव्हिश पार्टी दिली होती. 
- या पार्टीतील अनेक व्हिडिओ समोर आले होते. त्यातील एका व्हिडिओमध्ये राधिका मर्चंट ही अनंतची बहीण ईशा अंबानी आणि आणि त्यांची होणारी भाऊजय श्लोका मेहतासोबत 'पद्मावत' चित्रपटातील 'घुमर' गाण्यावर थिरकताना दिसली होती. 
- राधिका ही वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. वीरेन मर्चंट हे एडीएफ फूड्स लिमिटेडचे नॉन एक्झिकेटीव्ह डायरेक्टर आहेत. याशिवाय एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे सीईओ आणि व्हाइस चेअरमन आहेत. 
- या परिवाराला कच्छी भाटिया परिवार म्हटले जाते. ते मुळचे गुजरातमधील कच्छ येथील रहिवासी आहे. हे कुटुंब आता मुंबईला राहाते. 
- वीरेन मर्चंट यांचे वडील अजीतकुमार गोवर्धनदास मर्चंट (खटाऊ) हे देखील धिरुभाई अंबानी यांच्यासारखे साधारण ट्रेडरचे प्रसिद्ध उद्योगपती झाले होते. वीरेन यांच्या कुटुंबात पत्नी शैला, मुलगी अंजली आणि राधिका आहेत. 

 

अनेक कंपन्यांचे डायरेक्टर आणि एमडी आहेत वीरेन मर्चंट 
1. एन्कोर नॅचुरल पॉलीमर्स प्रायव्हेट लिमिटेड
2. एन्कोर पॉलीफ्रॅक प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड
3. ZYG फार्मा प्रायव्हेट लिमिटेड
4.साईदर्शन बिझनेस सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड
5. एन्कोर बिझनेस सेंटर्स प्रायव्हेट (बिझनेस सर्विस) लिमिटेड
6. एन्कोर बिझनेस सेंटर्स LLPमध्ये पार्टनर आहे.  
7. एन्कोर हेल्थ केअर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड (हेल्थ-सोशल वर्क)
8. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड

 

पत्नीही बिझनेसमध्ये 
- वीरेन मर्चंट यांची पत्नी शैला या एन्कोर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये डायरेक्टर आहेत. मुलगी अंजलीही या कंपनीत डायरेक्टर आहे. 

बातम्या आणखी आहेत...