आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Angry Bride Registers Police Complaint Against Groom And Family On Her Wedding Day

CRIME: लग्नाच्या दिवशीच पोलिस ठाण्यात पोहोचली नवरी; केला धक्कादायक खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिरसा - हरियाणातील सिरसा शहर पोलिस स्टेशनला नटलेली नवरी पाहून सगळेच हैराण झाले. आपल्या लग्नाच्या दिवशीच या तरुणीने पोलिसांकडे नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या तरुणीसोबत तिचे वडील सुद्धा होते. त्यांनी केलेल्या आरोपानुसार, लग्नाच्या दिवशीच नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी महागड्या वस्तूंची मागणी केली. तसेच नाराज होऊन लग्न रद्द केला आणि घरी परतले. नवरदेव विरोधात कठोर कारवाई करावी असे आवाहन त्यांनी पोलिसांना केले आहे. 


असे आहे प्रकरण...
> वधू पक्षाने सांगितल्याप्रमाणे, शहरातील गुरुद्वारामध्ये नटलेली नवरी आणि तिचे कुटुंबीय वर पक्षाची वाट पाहत होते. सकाळची वेळ असतानाही दुपार झाली परंतु कुणीच आले नाही. यानंतर वधूच्या वडिलांनी नवरदेवाच्या वडिलांना फोन लावला.
> त्या फोनला उत्तर या दोघांचे नाते लावणाऱ्या एका मध्यस्थाने उचलले आणि वर पक्षाची डिमांड त्यांच्यासमोर ठेवली. लग्नासाठी आम्हाला सुद्धा जेवढा खर्च येईल तो सर्व वधू पक्षानेच करावा. तसेच लग्नात एक महागडी वस्तू द्यावी जेणेकरून समाजात वधू पक्षाची शान वाढेल.
> मध्यस्थाच्या तोंडून असे शब्द ऐकल्यावर वधू पित्याच्या पायाखालची जमीन घसरली. त्यांनी वर पक्षाला आपल्या आणि आपल्या मुलीच्या इज्जतीसाठी वरात घेऊन येण्याच्या याचना केल्या. परंतु, वर पक्षाने त्याचे काहीच ऐकूण घेतले नाही. 
> यानंतर वधूने आपल्या पित्यासोबत पोलिस स्टेशन गाठले आणि प्रकरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी यानंतर वर पक्षाचा शोध घेतला आणि दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यात चर्चेसाठी बोलावले. जोपर्यंत दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...