Home | National | Other State | Another Mob Lynching, Hyderabad Techie Beaten To Death In Bidar

Mob Lynching: बिदरमध्ये अफवेत सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या, 3 जण गंभीर जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jul 15, 2018, 04:11 PM IST

कर्नाटकच्या बिदर येथे संतप्त जमावाने अपहरणाच्या टोळीच्या अफवेवरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या केली आहे.

 • Another Mob Lynching, Hyderabad Techie Beaten To Death In Bidar
  गंभीर जखमी झालेला युवक...

  बिदर - कर्नाटकच्या बिदर येथे संतप्त जमावाने अपहरणाच्या टोळीच्या अफवेवरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या केली आहे. या घटनेत हैदराबादचे टेक कर्मचारी मोहम्मद आझम याचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याच्यासोबत असलेले इतर 3 जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये एक व्यक्ती कतारचा नागरिक आहे. पोलिसांनी माहितीनुसार, मोहम्मद आझम आणि कतारच्या नागरिकासह 4 जण बिदरला फिरण्यासाठी गेले होते. त्याच दरम्यान कतारच्या नागरिकाने लहान मुलांना चॉकलेट वाटप केले. त्यावरून स्थानिकांनी आपल्या गावात अपहरणकर्त्यांची टोळी आल्याची अफवा उठवली. यातूनच जमावाने सर्वांना बेदम मारहाण सुरू केली. या प्रकरणात पोलिसांनी 32 जणांना अटक केली आहे. अर्धवट आणि बनावट व्हॉट्सअॅप व्हिडिओने आतापर्यंत देशभरात 20 जणांचा बळी घेतला आहे.


  कारच्या मागे मोटरसायकली घेऊन धावले गावकरी...
  > मोहम्मद आझम आणि मोहम्मद सलाम मुर्की गावात आले असताना रस्त्याच्या कडेला थांबले. त्याच ठिकाणी काही मुले दिसून आली. यानंतर सलामने आपल्या कारमधून काही चॉकलेट काढले आणि त्या मुलांना दिले. ही घटना गावात रिकामे बसलेल्या तरुणांनी आपल्या फोनमध्ये कैद केली आणि अख्ख्या गावात व्हॉट्सअॅपवरून तो व्हिडिओ पसरवला. काही मिनिटांतच लोक गोळा होण्यास सुरुवात झाली.
  > त्यापैकी काहींनी या 4 युवकांचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. यावर घाबरलेल्या आझम आणि त्याच्या मित्रांनी कारमध्ये बसून निघण्याचा प्रयत्न केला. कार सुरू देखील केली. परंतु, त्यांच्या कारचा गावातील युवकांनी मोटरसायकलवरून पाठलाग सुरू केला. काही दुचाकीस्वार बाइक कारच्या समोर आणून त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होते. यात एका बाइकला धडक बसली आणि त्या 4 युवकांनी आली गाडी थांबवली. त्याचवेळी गर्दीने त्या चौघांनाही कारच्या बाहेर काढून बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत मोहम्मद आझमचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या इतर 3 गंभीर जखमी मित्रांना उपचारासाठी हैदराबादच्या रुग्णालयात दाखल करावे लागले.

 • Another Mob Lynching, Hyderabad Techie Beaten To Death In Bidar

  जमावाने याच कारचा पाठलाग करून त्यांना अडवले आणि बाहेर काढून एकाचा जीव घेतला.

 • Another Mob Lynching, Hyderabad Techie Beaten To Death In Bidar

  रुग्णालयातील दृश्य

Trending