आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटीसाठी शिपायाचा अर्ज; म्हटले, पत्नी आठवण करते, आग्र्यातील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाग्रा - देशात पोलिसांना सुट्या मिळण्यास किती अर्ज- विनवण्या कराव्या लागतात, ही व्यथा एक पोलिसच सांगू शकतो. उत्तर प्रदेशातील अाग्र्याच्या शहागंज पोलिस ठाण्यातील शिपाई मनोज यांनी सुटीसाठी ठाणेप्रमुखास लिहिलेला अर्ज नेमक्या व्यथा मांडून जातो. मनोज यांनी अर्जात म्हटले आहे की, माझे आताच लग्न झाले आहे. पत्नी खूप आठवण काढते आहे. यासाठी मला घरी जाणे खूप गरजेचे आहे.


या अर्जात मनोजने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आठ दिवसाची किरकोळ रजा मागितली होती. मनोजच्या अर्जानंतर त्याला सुटी मंजूरही झाली आहे. तर मनोजच्या या अर्जाला सोशल मीडियावर खूप लाइक्स मिळत आहेत.


पोलिसांना खूप कमी असतात सुट्या : पोलिसांना खूप कमी रजा मिळतात. २४ तास सुरक्षा बंदोबस्तात राहावे लागते. त्यामुळे खडा पहारा देणाऱ्या पोलिसांवर खूप ताण असतो. त्यांना रात्री जागून काढाव्या लागतात. सणावारासही कामावर  हजर राहुन पोलिस नागरिकाच्या  जिवित व वित्ताचे संरक्षण करत असतात. मात्र, त्यांना सुटी हवी असेल तर खासगी कारणही स्पष्टपणे नमूद करावे लागते.

बातम्या आणखी आहेत...