आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईदला निघालेल्या जवानाचे अपहरण करून हत्या, केले होते दहशतवाद्यांचे एन्काऊंटर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी गुरुवारी सकाळी 9 वाजता घरातून निघाले होते 

- काही अंतरावर कलमपोरा येथे पोहोचताच त्यांचे अपहरण करण्यात आले 

 

श्रीनगर - सुटी घेऊन ईद साजरी करण्यासाठी घरी जाणारे लष्कराचे जवान औरंगजेब यांची दहशतवाद्यांनी शोपियांमधून अपहरण करून निर्घृणपणे हत्या केली. त्यांचे गुरुवारी सकाळी 9:30 वाजता कलमपोरामधून अपहरण करण्यात आले होते. नंतर त्यांचा मृतदेह रात्री 8 वाजता आढळून आला. हिजबुलचा दहशतवादी समीर टायगरच्या एन्काऊंटर करणाऱ्या टीममध्ये त्यांचा समावेश होता. 


शादीमर्गमध्ये तैनात होते औरंगजेब 
-4 जम्मू-काश्मीर लाइट इन्फेंट्रीचे जवान असलेले औरंगजेब हे 44 राष्ट्रीय रायफलबरोबर शोपियाँ येथील शादीमर्गमध्ये तैनात होते. राजौरी जिल्ह्याच्या मेंढर येथे ईद साजरी करण्यासाठी ते गुरुवारी सकाळी 9 वाजता निघाले होते. शादीमर्ग कॅम्पबाहेर त्यांच्या साथीदारांनी त्यांना एका प्रायव्हेट कारमध्ये बसवले. काही दूर म्हणजे कलमपोराला पोहोचताच चार-पाच दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले. 
- ड्राइव्हरकडून माहिती मिळताच मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. रात्री उशीरा पुलवामा जिल्ह्यामध्ये गोळ्यांनी चाळणी झालेला मृतदेह आढळला. 
- औरंगजेब मेजर शुक्ला यांच्याबरोबर तैनात होते. मेजर शुक्ला यांनी गेल्या महिन्यात दहशतवादी समीर टायगरचा चकमकीत ठार केले होते. 


ईदनंतर संपू शकते शस्त्रसंधी 
- केंद्र सरकारच्या सुत्रांनी संकेत दिले की, ईदनंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात राबवली जाणारी एकतर्फी शस्त्रसंधी संपण्याची शक्यता आहे. शस्त्रसंधी दरम्यान दहशतवादी हल्ल्यांत तीनपट वाढ झाली आहे. या मुद्द्यावर गुरुवारी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठक बोलावली होती. पण अद्याप याबाबत औपचारिक घोषणा झालेली नाही. 
- रमजानच्या सुरुवातीच्या 27 दिवसांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण तीनपटीने वाढले. या 27 दिवसांमध्ये 58 दहशतवादी हल्ले झाले. तर रमजान महिना सुरू होण्यापूर्वी 27 दिवसांत 18 हल्ले झाले होते.


सुटीवर आलेल्या जवानांना आधीही केले आहे लक्ष्य 
- दहशतवाद्यांनी यापूर्वीही सुटीवर येणाऱ्या जवानांना लक्ष्य केले आहे. मे 2017 मध्ये लष्कराचे लेफ्टनंट उमर फयाज यांची दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. 22 वर्षीय उमर शोपियाँमध्ये भावाच्या लग्नासाठी आले होते. 
- 2017 मध्ये शोपियाँच्याच टेरिटोरियल आर्मीचे जवान इरफान अहमद यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यांचेही घरातूनच अपहरण करण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...