आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांचे मृतदेह नातेवाईकांना देणार नाही, लष्करच करणार अज्ञातस्थळी दफन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीर - लष्करी कारवाया किंवा ऑपरेशनमध्ये मारल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांचे मृतदेह यापुढे त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द न करता अज्ञान स्थळी दफन केले जाण्याची शक्यता आहे. लष्कर याबाबत विचार करत असल्याची माहिती मिळाल्याचे एका न्यूज वेबसाईटने म्हटले आहे. 


लष्कराच्या विविध ऑपरेशनमध्ये जेव्हा एखाद्या दहशतवादी संघटनेचे सदस्य किंवा टॉप कमांडर मारले जातात त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटंबांना सुपूर्त केले जातात. पण या दहशतवाद्यांच्या आणि विशेषतः टॉप कमांडरच्या अंत्ययात्रेला स्थानिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित असतात. या तरुणांचे ब्रेनवॉश करून दहशतवादी संघटना त्यांना दहशतवादी संघटनेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. या गोष्टीला आळा घालण्यासाठी लष्कारने हा उपाय शोधला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रा मोठ्या प्रमाणात निघतात. त्यांचे व्हिडिओ तयार करून तेही तरुणांना पाठवले जातात. त्या माध्यमातूनही त्यांचे ब्रेनवॉश केले जाते. त्यामुळे यापुढे दहशतवाद्यांचे मृतदेह नातेवाईकांना द्यायचेच नाही, तर त्यांना अज्ञात स्थळी दफन करण्याच्या या निर्णयावर विचार सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...