आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे अर्थमंत्री अंधश्रद्धा पाळतात का? नवी असो वा जुनी, कारचा नंबर 6666

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - अर्थमंत्री अरुण जेटली या वेळी यूपीतून राज्यसभा सदस्यत्वासाठी निवडणूक लढत आहेत. त्यांनी सोमवारी आपले नॉमिनेशन दाखल केले. देशाचे अर्थखाते सांभाळणारे जेटली हे कारच्या नंबरबाबत मात्र अंधश्रद्धा पाळताना दिसतात. त्यांच्या प्रत्येक कारचा नंबर 6666 आहे. त्यांच्या निवडणूक शपथपत्रातून ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते.


2017 मध्ये खरेदी केली मर्सिडीझ
- अरुण जेटली यांनी अर्थमंत्री म्हणून गतवर्षी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात 4 लक्झरी कार दाखवली होती. त्या चारही कारच्या नंबरप्लेटमध्ये एक नंबर कॉमन होता - 6666.
- यावर्षी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांनी होंडा एकॉर्ड मॉडेल 2009 ला हटवून एक नवी मर्सिडीश दाखवली आहे. ताफ्यात आणखी 3 कार आहेत, परंतु नंबर प्लेट तीच- 6666.
- अरुण जेटली कारच्या नंबर प्लेटबाबत 6666 नंबरला लकी मानतात, हेच यावरून दिसून येते.

 

पत्नीवर वाढत आहे कर्ज
- अर्थमंत्री म्हणून अरुण जेटली यांनी 2017 मध्येही शपथपत्र सादर केले होते. यात त्यांनी आपल्या पत्नीवर 8.75 कोटी रुपये कर्ज असल्याचे दाखवले होते.
- राज्यसभा निवडणुकीसाठी यूपीतून नॉमिनेशन भरताना जेटली यांनी 9.6 कोटी रुपये कर्ज दाखवले आहे. यात स्वत: जेटली यांच्यावर 42.22 लाख रुपये कर्ज आहे, तर त्यांच्या पत्नीवर 9.14 कोटी रुपये कर्ज दाखवण्यात आले आहे.
- तथापि, 2012 मध्ये राज्यसभा निवडणुकीत अर्ज दाखल करताना जेटली आणि त्यांच्या पत्नीवर एक रुपयाही कर्ज नव्हते.

 

64 कोटींचे बंगले, 1.5 कोटींची मर्सिडीझ
- अरुण जेटली यांनी या वेळी 111 कोटींची संपत्ती जास्त घोषित केली आहे. यात 64.4 कोटींसाठी फक्त त्यांचे बंगले आणि फ्लॅट आहेत.
- जेटली यांचे दिल्लीमध्ये 3 फ्लॅट आहेत. तिन्हींमध्ये त्यांच्या पत्नीची भागीदारी आहे. 
- याशिवाय गुजरात आणि गांधीनगरमध्ये एक घर आणि पंजाबच्या अमृतसरमध्ये एक बंगला आहे.
- जेटली यांच्याकडे 3 लक्झरी कारही आहेत, यांची एकत्रित किंमत 1.68 कोटी रुपये आहे.
- त्यांच्या कार कलेक्शनमध्ये 2 मर्सिडीझ आणि एक टोयोटा कार सामील आहे.

 

जेटलींकडे पत्नीपेक्षा जास्त सोने
- शपथपत्रात उमेदवाराला आपल्या पती अथवा पत्नीच्या नावे असलेली संपत्तीही सादर करावी लागते.
- त्यांच्या शपथपत्रानुसार, अरुण जेटली 1.32 कोटींचे दागिने ठेवतात. यात 3 किलो सोने आणि तब्बल 16 किलो चांदी सामील आहे.
- दुसरीकडे, त्यांच्या पत्नीकडे एकूण 24 लाख रुपयांचे सोने आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज 

बातम्या आणखी आहेत...