आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जीएसटी काँन्सिल मीटिंग नंतर डिनरचे आयोजन केले होते. या डिनरला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या डिनरमधील जेटली आणि केजरींचे काही फोटो समोर आले आहेत. त्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली होती. केजरीवालांनी मोदी सरकारच्या मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे दिल्ली अध्यक्ष अजय माकन यांनी ट्विट करुन या भेटीचा समाचार घेतला. डीडीसीए भ्रष्टाचार प्रकरणात केजरीवाल यांच्यासह 5 आप नेत्यांनी अरुण जेटलींवर आरोप केले होते. त्यानंतर अर्थमंत्री जेटलींनी त्यांच्याविरोधात 10-10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
सिसोदियांच्या निमंत्रणावर आले होते जेटली
- गुरुवारी जीएसटी काँन्सिलली मीटिंग झाली. यानंतर सदस्यांसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी एक डिनर होस्ट केले होते. यामध्ये अरुण जेटली, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि वेगवेगळ्या राज्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
- यावेळी केजरीवाल आणि जेटली यांची भेट झाली आणि दोघे एकमेकांसोबत चर्चा करत असताना दिसले.
- आपच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये दोन्ही नेते उत्साहाने एकमेकांसोबत बोलत असल्याचे दिसत आहे.
अजय माकन यांनी घेतला चिमटा...
मोदी सरकारमधील मंत्र्यांची केजरीवाल यांनी भेट घेतल्यानंतर काँग्रेसच्या अजय माकन यांनी त्यांना चिमटा घेतला.
- फोटोला ट्विट करत माकन म्हणाले, 'बदले-बदले से मेरी सरकार नजर आते हैं, वाह केजरीवाल जी वाह! क्या पुरानी दिखावटी कुश्ती का ड्रामा खत्म? यामुळेच गोवा निवडणुकीआधी गडकरी म्हणाले होते, केजरीवालांची पार्टी भाजपला मदत करणारी आहे.'
- तसेच, दोन विरोधक एकाच सोफ्यावर बसलेल्या फोटोवर सोशल मीडिया यूजर्सही वेगवेगळ्या कॉमेंट करत आहेत. काहींनी याला मजबूरी तर काहींनी बिहार पार्ट-2 म्हटले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.