आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामबापूने ‘लाइव्ह’ प्रवचन दिल्यानंतर वाद; फोनवर बोलण्याची सुविधा काढणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या आसारामने शुक्रवारी सायंकाळी सोशल मीडियावर लाइव्ह ऑडिओद्वारे समर्थकांना मार्गदर्शन केले होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर तुरुंग प्रशासनाने आसारामविरुद्ध कडक पावले उचलण्याचा इशारा दिला. यापुढे असा प्रकार घडल्यास फोनवर बोलण्याची सुविधाही दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने म्हटले. 


जयपूरच्या तुरुंग मुख्यालयाने या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता आसाराम नावाच्या फेसबुक पेजवरील लाइव्ह ऑडिओला हटवण्यात आले. परंतु रात्री उशिरा या ऑडिओला आसारामच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले होते. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणात आसारामला आजन्म कैदेची शिक्षा दिली होती. शिक्षेनंतर दोनच दिवसांत म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी फेसबुक पेजवर एक पोस्ट आली. यात विशेष सूचनेअंतर्गत आसाराम जोधपूर तुरुंगातून सायंकाळी ६.३० वाजता लाइव्ह येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. ठरलेल्या वेळेत लाइव्ह झालेसुद्धा. सोशल मीडियावर लाइव्हसंदर्भातील चर्चेला उधाण आले. त्यानंतर ऑडिओला डिलीट करण्यात आले. परंतु रात्री उशिरा त्या ऑडिओला ब्लॉग आणि वेबसाइटवर अपलोड करण्यात आले होते. शनिवारी तो ऑडिओ वेबसाइटवर होता. 

बातम्या आणखी आहेत...