आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DB SPL: आसाराम केसमधील पीडितेचे आई-वडील म्हणाले- साडेचार वर्षे नजरकैदेत काढली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहजहांपूर येथे पीडितेच्या कुटुंबाबाहेर तैनात पोलिस. - Divya Marathi
शाहजहांपूर येथे पीडितेच्या कुटुंबाबाहेर तैनात पोलिस.

शाहजहांपूर(यूपी)/जोधपूर - आसाराम केसमध्ये बुधवारी निर्णय येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर 'भास्कर' पीडितेच्या घरी उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर येथे पोहोचले. त्यांनी पाहिले की पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा आणि फक्त सन्नाटा पसरलेला आहे. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला आत प्रवेश नाही. आसाराम समर्थक शहरात लपून बसले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पीडितेच्या भावाला दोन दिवसांपूर्वी शस्त्राचा परवाना दिला आहे. निकालाचा क्षण आता जवळ आला आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी सांगितले, की साडे चार वर्षे आम्ही स्वतःच्याच घरात नजरकैदेत काढली. या काळात मुलीने मोबाइलला स्पर्ष देखील केला नाही.  लैंगिक शोषणाच्या आरोपात आसारामला तुरुंगात टाकणारी विद्यार्थीनी साडे चार वर्षांपासून जे आयुष्य जगत आहे, ते कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी नाही. पीडितेच्या वडिलांचे म्हणणे आहे की मुलगी आता त्या प्रसंगाबद्दल ब्र शब्दही बोलण्यास तयार नाही. आसारामचे नावही काढले तरी तिचा पारा चढतो. आता आम्ही वाट पाहात आहोत निर्णयाची. निर्णय आल्यानंतरच त्यावर बोलू, तोपर्यंत काहीही बोलणे योग्य होणार नाही. 

 

काय म्हणाले पीडितेचे वडील 
- हे कुटुंब आता कोणाला भेटायलाही घाबरते. आता निर्णयाचा क्षण जवळ आला आहे. मात्र त्याआधी त्यावर काही टिप्पणी करण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहात आहोत. निर्णय आल्यानंतरच त्यावर बोलू. त्याआधी त्यावर काही बोलणे योग्य होणार नाही. 
- त्यासोबतच मुलीच्या मानसिक स्थितीबद्दल ते म्हणाले, त्या घटनेनंतर तिला खूप काही सहन करावे लागले आहे. आता ती त्या आठवणीसुद्धा काढू देत नाही. कोणी तो विषय छेडला तर ती चिडते. त्यामुळे कुटुंबात कोणी आसारामचे नावसुद्ध काढत नाही. 

 

असे आहे पीडितेच्या घरचे वातावरण 
- 15 ऑगस्ट 2013ची रात्र ही पीडितेसाठी काळरात्रीपेक्षा कमी नव्हती. खटला दाखल केल्यापासून सतत धमक्यांचा सामना करावा लागत होता. त्यानंतरही पीडिता आणि तिचे कुटुंब मागे हटले नाही. त्यांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागला. त्यांना स्वतःच्या घरात नजरकैदेत असल्यासारखे राहावे लागत आहे. या संपूर्ण काळात त्यांच्या घराबाहेर सतत पोलिसांचा पहारा राहिला. पीडिता आणि तिच्या घराला सुरक्षा पुरवण्यात आली. घरात कोणालाही थेट प्रवेश दिला जात नाही. सध्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला कुटुंबियांना भेटू दिले जात नाही. 

 

अशी सुरु झाली होती आसाराम विरुद्धची केस 
- 15 ऑगस्ट 2013च्या रात्री जोधपूर जवळील मणाई गावाशेजारील एका फार्म हाऊसवर आपल्या गुरुकुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे आसारामने लैंगिक शोषण केले. 
- 19 ऑगस्ट 2013 रोजी पीडिता आणि तिच्या आई-वडिलांनी नवी दिल्ली येथील कमला नगर पोलिस स्टेशनमध्ये रात्री 11.05 वाजता आसारामविरोधात तक्रार दिली. त्यावर त्याच रात्री 1.05 वाजता पोलिसांनी पीडितेचे मेडिकल केले आणि 2.45 वाजता एफआयआर दाखल केला. दुसऱ्याच दिवशी, अर्थात 20 ऑगस्टला पीडितेचा 164 अंतर्गत जबाब नोंदवून घेतला. झिरो नंबर एफआयआर दाखल करुन जोधपूरला पाठवण्यात आला. 
- 21 ऑगस्ट 2013 रोजी जोधपूर पोलिसांनी सायंकाळी सव्वा सहा वाजता गुन्हा दाखल केला. आसारामविरोधात सीआरपीसीच्या कलम  342, 376, 354(ए), 506, 509 व 134 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासोबतच पॉक्सो अॅक्टच्या कलम 8 आणि जेजेए च्या कलम 23 व 26 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.  
- यानंतर जोधपूर पोलिसांची एक टीम 31 ऑगस्टला इंदूर येथे पोहोचली आणि त्यांनी आसारामला अटक केली. 
- 6 नोव्हेंबर 2013 रोजी पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले. 
- 13 फेब्रुवारी 2014 रोजी कोर्टाने या प्रकरणी मुख्य आरोपी आसाराम सहआरोपी शिल्पी, शरद, प्रकाश यांच्याविरोधात आरोप निश्चित केले. 
- 19 मार्च 2014 ते 6 ऑगस्ट 2016 पर्यंत अभियोजन पक्षाने आपल्या बाजूने 44 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यासोबत 160 दस्तऐवज सादर केले. 4 ऑक्टोबर 2016 रोजी आसारामचा जबाब नोंदवण्यात आला. 
- 22 नोव्हेंबर 2016 ते 11 ऑक्टोबर 2017 रोजी बचाव पक्षाने 31 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यासोबत 225 दस्तऐवज सादर केले. 
- एससी-एसटी कोर्टात 7 एप्रिल रोजी सुनावणी पूर्ण झाली आणि कोर्टाने निर्णय देण्यासाठी 25 एप्रिल ही तारीख निश्चित केली. 

बातम्या आणखी आहेत...