आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शाहजहांपूर (उत्तर प्रदेश) - आसारामच्या लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितेने बुधवारचा संपूर्ण दिवस घरात बसून टीव्हीवर न्यूज पाहाण्यात घालवला. आसारामला शिक्षा सुनावण्याच्या आधी तिने अन्नाला स्पर्ष केला नाही आणि शिक्षा सुनावल्यावरही तिने काही खाल्ले नाही. निर्णय येण्याआधी तिच्या मनात धाकधूक होती. निर्णय आल्यानंतर चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. तिने तिच्या आईला मिठी मारली आणि दोघींना रडू कोसळले. न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढल्याचे सांगत तिने, आता आयएएस होण्याचा विचार अधिक दृढ झाल्याचे म्हटले.
'आमची लढाई कठीण नाही तर अतिशय कठीण होती'
- कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पीडिता म्हणाली, 'आम्हाला न्याय मिळाला आहे. सुरुवातीला मी घाबरले होते. परंतू आता न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढला आहे. मी ऐकत होते की न्यायालयाचा निकाल येण्यास अनेक वर्षे लागतात, तरीही आरोप सिद्ध होत नाही. परंतू या फक्त धारणा आहेत. आमची लढाई कठीण होती. खूप कठीण होती. मात्र आता आयएएस होण्याचा माझा निश्चय अधिक दृढ झाला आहे.'
एक दिवस आधी दिली बीए सेकंड इअरची परीक्षा
- निर्णय येण्याच्या एक दिवस आधी मंगळवारी पीडितेने बीए सेकंड इअरची परीक्षा दिली होती.
- ती म्हणाली, 'मी यापेक्षा खूप पुढे असते. परंतू या केसने माझे करिअर खराब केले. आता मी निश्चित आणि निडर होऊन मला जे करायचे आहे ते करु शकणार आहे. या पाच वर्षांमध्ये माझा माझ्या मैत्रिणी, नातेवाईक आणि परिचितांसोबतचा संपर्क तुटला होता. मी देशातील महिलांना सांगू इच्छिते की कोणासोबतही कधी अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्याने घाबरू नका. धैर्याने, आत्मविश्वासाने त्या प्रसंगाचा सामना करा.'
पीडितेच्या घराबाहेर मीडियाची गर्दी
- उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील पीडितेच्या घराबाहेर बुधवारी सकाळपासून मीडियाची गर्दी झाली होती. घराबाहेर तीन पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते.
- सकाळी साडे दहा वाजता पीडितेचे वडील घराबाहेर आले आणि आसारामला दोषी ठरवल्यानंतर त्यांनी 5 मिनिटांत आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर कोर्टाने निकाल दिल्यानंतर अडीच वाजता ते पुन्हा बाहेर आले आणि मीडियाला प्रतिक्रिया दिली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.