आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आसारामची पूर्ण कहाणी: Asaram Complete Story, 3rd Pass Asaram Made 400 Ashram

आसारामची पूर्ण कहाणी: असे उभारले होते 2300 कोटींचे साम्राज्य, 48 वर्षांत 400 आश्रम-ट्रस्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाराम बापूचे कुटुंब मुळात सिंध, पाकिस्तानच्या जाम नवाज अली तालुक्यात राहत होते. त्यांचे जन्मनाव आसुमल थाऊमल हरपलानी असे होते. - Divya Marathi
आसाराम बापूचे कुटुंब मुळात सिंध, पाकिस्तानच्या जाम नवाज अली तालुक्यात राहत होते. त्यांचे जन्मनाव आसुमल थाऊमल हरपलानी असे होते.

जोधपूर - अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात आरोपी आसारामवर उद्या जोधपूरचे न्यायालय निकाल सुनावणार आहे. निकालासाठी जोधपूर सेंट्रल जेलमध्येच विशेष कोर्ट तयार करण्यात आले आहे. निकालामुळे जोधपूरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. जोधपुरमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. याचा अर्थ म्हणजे एकत्र 4 वा त्याहून अधिक जणांना एका जागी येता येणार नाही.


कोण आहे आसाराम? 
- आसाराम बापूचे कुटुंब मुळात सिंध, पाकिस्तानच्या जाम नवाज अली तालुक्यात राहत होते. त्यांचे जन्मनाव आसुमल थाऊमल हरपलानी असे होते.
- फाळणीनंतर त्यांचे कुटुंब अहमदाबादेत येऊन स्थिरावले. त्यांचे वडील लाकूड आणि कोळशाचा व्यापार करायचे.
- 'संत आसाराम बापूजी की जीवन झांकी' या शीर्षकाच्या त्यांच्या ऑटोबायोग्राफीनुसार, त्यांनी फक्त इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण घेतले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांना शिक्षण सोडावे लागले होते.
- त्यांनाही काही दिवस लाकूड आणि कोळशाचा व्यापार सांभाळावा लागला होता. परंतु व्यापारात त्यांचे मन रमले नाही.

 

लग्नाच्या 8 दिवसांपूर्वीच पळून गेले होते घरातून 
- 15 वर्षे वयात त्यांनी आपले घर सोडून भारुच येथील एक आश्रम गाठले. त्यांच्या ऑफिशियल वेबसाइटनुसार लक्ष्मी देवींशी लग्नाच्या फक्त 8 दिवसांपूर्वी ते घरातून पळून गेले होते. तथापि, नंतर त्यांचे लग्नही झाले.
- भारुचमध्ये त्यांनी लीलाशाह या आध्यात्मिक गुरूंकडून दीक्षा घेतली. दीक्षेआधी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्यांनी 40 दिवस कठोर साधना केली होती. दीक्षेच्या नंतर गुरू लीलाशाह यांनी त्यांचे नाव आसाराम बापू ठेवले होते.

 

असे उभारले होते 2300 कोटींचे साम्राज्य
- जून 2016 मध्ये आयकर विभागाने त्यांची 2300 कोटींहून अधिक रुपयांची अघोषित संपत्ती उजागर केली होती.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांनी तब्बल 400 ट्रस्ट बनवल्या होत्या, यांच्या माध्यमातून ते पूर्ण साम्राज्यावर नियंत्रण ठेवायचे. या ट्रस्ट्समध्ये भक्तांचा पैसा जमा व्हायचा. लोकप्रियता वाढण्यासोबतच आसारामने भक्तांद्वारे देण्यात आलेल्या देणगीतून आपल्या ब्रँडची मासिके, प्रार्थना पुस्तके, सीडी, साबण, धूपबत्ती आदींची विक्री सुरू केली होती. एवढेच नाही, आश्रमाच्या नावावर अनेक एकर जमीन हडपली होती. यामुळे त्यांचा खजिना सातत्याने वाढत राहिला.
- आश्रमातून प्रकाशित दोन पत्रिका ऋषिप्रसाद आणि लोककल्याण सेतूच्या 14 लाख कॉपी मंथली विक्री व्हायच्या, यातून वार्षिक 10 कोटी रुपयांच्या जवळपास रक्कम यायची.

 

'भक्तां'मध्ये सामील होते अनेक VVIP
- आसाराम बापूच्या अनुयायांमध्ये फक्त आम जनताच नाही, तर व्हीव्हीआयपीही सामील होते. मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि छत्तीसगडचे रमण सिंह त्यांचे भक्त होते. राजस्थानचे अशोक गहलोत आणि पीएम नरेंद्र मोदीही त्यांना खूप मानायचे. मोदी यांनी आसाराम यांच्या अहमदाबादेतील आश्रमातही भेट दिलेली आहे.

 

कुणी लावले होते आरोप?
- आसाराम बापूंवर पहिल्यांदा लैंगिक शोषणाचा आरोप आश्रमातील एका तरुणीने केला होता. तरुणीच्या मते, जोधपूरच्या मनई गावातील आश्रमात आसारामने तिच्यावर बळजबरी केली होती.
- या केसमध्ये आसाराम 31 ऑगस्ट 2013 पासून तुरुंगात आहे. त्यांच्याविरुद्ध पॉक्सो अॅक्ट दाखल आहे.
- पीडितेच्या वकील पी. सी. सोलंकी यांच्या मते, आसारामला कमीत कमी 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...