Home | National | Other State | asaram convicted once he was tongawala in ajmer

कधी येथे टांगा चालवत होता आसाराम, दोन-दोन आण्यांसाठी लोकांशी भांडायचा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 25, 2018, 06:20 PM IST

कधीकाळी आसाराम हा टांगा चालवून पोट भरत होता. त्याचे खरे नाव आसुमल हरपलानी आहे.

 • asaram convicted once he was tongawala in ajmer
  आसारामला लैंगिक अत्याचार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली.

  जोधपूर - अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी जोधपूर स्पेशल कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आसाराम कोण आहे, त्याने स्वतःला स्वयंघोषित संत जाहीर केले आहे. हे सर्व तुम्हाला माहित आहे. मात्र कदाचित तुम्हाला हे माहित नसेल की कधीकाळी आसाराम हा टांगा चालवून पोट भरत होता. त्याचे खरे नाव आसुमल हरपलानी आहे. त्याचे कुटुंब सिंध प्रांतातील जाम नवाज अली तालुक्यात राहात होते. आता हा भाग पाकिस्तानमध्ये आहे. फाळणीनंतर त्याचे कुटुंब गुजरातमधील अहमदाबादमध्ये येऊन स्थायिक झाले.

  - एका रिपोर्टनुसार 40 वर्षांपूर्वी आसाराम अजमेरमध्ये आसुमल सिंधी टांगेवाला नावाने ओळखला जात होता. तेव्हा तो येथील डिग्गी चौकात टांगा चालवत होता.

  - जवळपास दीड वर्षे टांगा चालवल्यानंतर या व्यवसायात त्याचे मन रमले नाही. त्यानंतर एका चहाच्या ठेल्यावर काम करण्यास त्याने सुरुवात केली.
  - असे म्हटले जाते की आसाराम एकही सवारी सोडत नव्हता, मग भलेही कमी पैसे मिळाले तरी चालतील.
  - गेल्या कित्येक दशकापासून अजमेर टांगा यूनियनचे सचिव असलेले हीराभाई यांनी सांगितल्यानुसार, आसुमलला नगरपालिकेकडून टांगा चालवण्याचा परवाना त्यांनी मिळवून दिला होता.
  - त्यांनी सांगितल्यानुसार, आसुमल तेव्हा त्याच्या काकासोबत अजमेरच्या शीशा खान भागात एका किरायाच्या घरात राहात होता.

  सवारी मिळवण्यासाठी भांडायचा आसाराम
  - त्याकाळात अजमेरमधील शहर वाहतूकीसाठी टांगा हा एकमेव पर्याय होता.
  - तेव्हा सवारी चारआणे, आठआणे प्रवासासाठी देत होते. मात्र त्यापेक्षाही कमी पैसे घेऊन सवारी घेऊन जाण्यासाठी आसाराम धडपडत असायचा.

  दोन वर्षे आजमेरमध्ये राहिला आसाराम
  - आसारमचा आजमेरमधील मुक्काम साधारण दोन वर्षांचा होता. तो फार महत्त्वाकांक्षी होता. त्याला श्रीमंत होण्याची इच्छा होती.
  - आजमेरमधून आसाराम अहमदाबादला परत गेला. त्यानंतर तो अध्यात्मिक गुरु आणि नंतर तांत्रिक आसाराम म्हणून पुढे आला.

 • asaram convicted once he was tongawala in ajmer
  आजमेरमध्ये दीड-दोन वर्षे राहिल्यानंतर आसुमल अहमदाबादला गेला आणि आसाराम झाला.
 • asaram convicted once he was tongawala in ajmer
  आसारामचे वय 77 वर्षे आहे आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Trending