आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाराम आता कैदी नंबर 130, वॉर्ड-बॅरेक तिच मात्र आता पक्का कैदी; तुरुंगात करणार हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसारामला आजन्म कारावास सुनावण्यात आला आहे. - Divya Marathi
आसारामला आजन्म कारावास सुनावण्यात आला आहे.

जोधपूर - अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात आसारामला बुधवारी जोधपूर कोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर रात्रभर त्याला रडू कोसळले. लैंगिक शोषणाचा दोषी आसाराम आता पक्का कैदी झाला असून त्याला कैदी नंबर 130 म्हणून आता ओळखले जाईल. पॉक्सो अॅक्टचा हा ऐतिहासिक निकाल आहे. या कायद्याने आजीवन कारावासाची ही देशातील पहिली शिक्षा आहे. एससी-एसटी कोर्टचे जज मधुसूदन शर्मा यांनी आसारामसह आणखी दोघांना बुधवारी शिक्षा सुनावली. आसारामच्या छिंदवाडा येथील गुरुकुलची वॉर्डन शिल्पी उर्फ संचिता गुप्ता आणि डायरेक्टर शरदचंद्र यांना जज शर्मा यांनी प्रत्येकी 20-20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आसारामचा सेवक शिवा आणि स्वयंपाकी प्रकाश यांना निर्दोष सोडण्यात आले आहे. 

 

कैदी म्हणून तुरुंगात पाठवले 
- आसाराम जवळपास पाच वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याला आशा होती की तो तुरुंगातून बाहेर पडेल. बुधवारी निर्णय पीडितेच्या बाजूने लागला आणि आसारामला 5-10 वर्षांसाठी नाही तर थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. 
- आसाराम जोधपूर सेंट्रल जेलमध्ये गेल्या 4 वर्षे 7 महिन्यांपासून कैद आहे. बुधवारी सायंकाळी त्याला कैदी नंबर 130 म्हणून ओळख मिळाली. 
- जोधपूर जेलमध्ये तयार करण्यात आलेल्या कोर्टरुममधून बाहेर पडल्यानंतर आसारामला शिक्षेचा कैदी म्हणून पुन्हा त्याच वॉर्ड 2 मधील बॅरेक नंबर एकमध्ये पाठवण्यात आले. 

 

तुरुंगाचे कपडे आणि जेवणही करावे लागेल 
- डीआयजी (कारागृह) विक्रमसिंह कर्णावत यांनी सांगितले, की आसाराम आता शिक्षेचा कैदी आहे. यामुळे यापुढे त्याला आश्रमातून आलेले जेवण मिळणार नाही. 
- तुरुंगात त्याला आता इतर कैद्यांप्रमाणेच जेवण मिळेल. आसाराम सहसा संध्याकाळी जेवण घेत नाही. त्याला कैद्यांचे कपडे घालावे लागतील.  
- आसाराम रात्रीच्या जेवणाऐवजी फक्त दुध घेत होता. आता तुरुंगाच्या कँटीनमधील दूध त्याला घ्यावे लागेल. 
- दुसरीकडे, आसाराच्या शाहजहांपूर येथील गुरुकुलचा संचालक शरदचंद्र याला कैदी नंबर 129 मिळाला आहे. 
- महिला तुरुंगात पाठवण्यात आलेल्या शिल्पी उर्फ संचिता गुप्ताला कैदी नंबर 76 मिळाला आहे. 

 

वयोवृद्ध कैद्यांच्या श्रेणीनुसार झाडांना पाणी देण्याचे काम 
- सरकारी नियमांनुसार 70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुरुष कैद्याला कोणतेही अवजड काम दिले जात नाही. 
- डीआयजी कर्णावत यांनी सांगितले, की या नियमानुसार 77 वर्षांच्या आसारामला तुरुंगातील झाडांना पाणी देण्याचे काम दिले जाण्याची शक्यता आहे. 

 

एक सेवादार निर्दोष सुटला तर दुसरा सेवेत हजर 
- आसाराम जवळपास पाच वर्षांपासून तुरुंगात आहे. या काळात त्याचा स्वंयपाकी प्रकाश त्याच्या सोबत होता. आसारामची सेवा करता यावी यासाठी प्रकाशने गेल्या चार वर्षांत जामीन घेतला नव्हता. बुधवारी तो निर्दोष सुटला आहे. 
- प्रकाश बाहेर गेल्यामुळे आता आसारामच्या सेवेत गुरुकुल संचालक आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...