आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कलमांमुळे मोठे-मोठे वकीलही तुरुंगातून सोडवू शकले नाहीत आसारामला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात कैदेत असलेल्या आसारामला कोर्टाने दोषी ठरवले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी कैदेत असलेल्या आसारामला 31 ऑगस्ट 2013 ला इंदूरहून अटक करण्यात आली होती. छिंदवाडा गुरूकुलमध्ये शिकणाऱ्या मुलीने आसारामवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. 1698 दिवसांपासून आसाराम जामीनासाठी कोर्टाच्या खेट्या घालत आहे. त्याने सेशन कोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत या प्रकरणी दाद मागितली. आजारपण, वयाचा दाखलाही दिला. पण कोर्टाने आसारामला जामीन दिला नाही. या दरम्यानच्या काळात तीन साक्षीदारांनी प्राण गमावला आहे. 


आसारामवर कोणकोणत्या कलमांतर्गत खटले दाखल करण्यात आले आहेत, आणि त्याअंतर्गत किती शिक्षा मिळू शकते हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत? 


नव्या कायद्याच फाशीची तरतूद 
सरकारने नुकताच पॉक्सो अॅक्टमध्ये बदल केला आहे. त्यात अल्पवयीन मुलांबरोबर बलात्काराच्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे. पण आसारामवर हा लागू होणार नाही. मध्यप्रदेश हायकोर्टाचे वरिष्ठ वकील संजय मेहरा यांनी सांगितले की, अपराध ज्यावेळी घडला त्यावेळी असलेल्या तरतुदींनुसारच शिक्षा सुनावली जाते. नवा कायदा जुन्या प्रकरणांनाही लागू असेल असा नव्या कायद्यात कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे आसारामला फाशी होणार नाही, हे स्पष्ट आहे. 


जन्मठेप झाली तरी, 8 वर्षे राहावे लागेल तुरुंगात 
आसारामला जन्मठेप झाली तरीही त्याला तुरुंगात 8 वर्षे घालवावी लागणार आहे. जेल मॅन्युअलनुसार जन्मठेपेची शिक्षा झाल्यास जास्तीत जास्त 14 वर्षांपर्यंत तुरुंगात राहावे लागेल. आसाराम 2013 पासून तुरुंगात कैदेत आहे. त्यानुसार त्याने तुरुंगात 6 वर्षे घालवली आहेत. 14 वर्षांमधून ही 6 वर्षे वजा होतील त्यानंतर आसारामला 8 वर्षे तुरुंगात राहावे लागेल. त्याला 3 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्याला जामीनासाठी हायकोर्टात अपील करावे लागेल. 


कोणत्या कलमांतर्गत दाखल झाला गुन्हा 
आसारामवर 19 ऑगस्ट 2013 ला दिल्लीच्या कमलानगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती. आसारामवर झिरो नंबरची एफआयआर दाखल करण्यात आली होती. त्यात आयपीसी च्या कलम 342, 376, 354-ए, 506, 509/34, जेजे अॅक्ट 23 आणि 26 तसेच पॉक्सो अॅक्टच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कोणत्या कलमांमुळे आसारामला तुरुंगातून बाहेर येता आले नाही.. 

 

 

बातम्या आणखी आहेत...