आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जोधपूर - बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा मिळाल्याच्या दोनच दिवसांनी आसाराम सोशल मीडियावर आला. शुक्रवारी आश्रमाच्या सोशल मीडिया अकाउंटवर आसारामचा फोटो लागला आणि व्हिडिओ व प्रवचन देतानाचा मेसेज चालला. त्यात आसाराम म्हणतो- “पहले शरद व शिल्पीला काढूत. मग आम्ही येऊ तुमच्यामध्ये.” यासाठी आसारामच्या फेसबुक पेजवर संध्याकाळीच सूचना जारी करण्यात आली होती. लिहिले होते- 27 एप्रिल रोजी जोधपूर जेलमधून संध्याकाळी 6.30 वाजता ऑडिओ लाइव्ह येण्याची शक्यता आहे. ‘मंगलमय’वर जरूर ऐका. ‘मंगलमय’ आसारामचे मोबाइल अॅप आहे. तथापि, एका तासानंतर ऑडियोला फेसबुक आणि मंगलमय अॅपवरून हटवण्यात आले.
जेल प्रशासन म्हणाले- आसारामने फोनवरून साबरमती आश्रमाशी बातचीत केली होती...
- जेल प्रशासनाच्या मते, आसारामने साबरमती आश्रमात 17 मिनिटे बातचीत केली होती, बहुतेक तेच प्रसारित करण्यात आले. दुसरीकडे, डीआयजी (जेल) विक्रमसिंह कर्णावत म्हणाले की, जेलमध्ये बंदिवान वा कैद्यांना कोणत्याही दोन क्रमांकांवर एका महिन्यात एकूण 80 मिनिटे बोलण्याची अनुमती असते. या दोन क्रमांकांवर सर्वात आधी एटीएसकडून व्हेरिफिकेशन केले जाते. आणि यानंतर कैदी वा बंदी त्यानंबरवर बोलू शकतो. शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता आसारामने साबरमती आश्रमात जदवानी निशांतशी 17 मिनिटे बातचीत केली होती.
फोनवर असे करणे योग्य नाही, आसारामची सुविधा काढली जाऊ शकते: डीआयजी
- तुरुंगाचे डीआयजी म्हणाले, “फोनवर केलेली बातचीतच सोशल मीडियावर लाइव्ह केल्याची शक्यता आहे. तथापि, आसारामने जी काही बातचीत केली असेल, ती तुरुंगाच्या एसटीडीवर लागलेल्या सिस्टिममध्ये रेकॉर्ड आहे. फोनवरचे बोलणे सोशल मीडियावर व्हायरल केल्याबद्दल काही निश्चित नियम नाहीत, परंतु असे करणे अनुचित आहे, कारण कैदी वा बंदीला आपल्या नातेवाइकाशी वा इतरांशी बोलण्याची सुविधा या उद्देशाने दिली जात नाही. यामुळे कैद्याची ही सुविधा काढून टाकली जाऊ शकते.”
ऑडिओचे प्रमुख अंश
- सोशल मीडियावरून हटवण्यात आला ऑडिओ रात्री उशिरा एका ब्लॉगवर समोर आला. यात आसाराम म्हणतोय, “जितनी बड़ी गाज गिरती है, उतने बड़े रास्ते भी बन जाते हैं। पहले तो शिल्पी बेटी को निकालुंगा और फिर शरद बेटे को, ऊपर एक से एक कोर्ट हैं। कुछ लोग झूठ फैलाने में लगे हैं... रोने की बात झूठ है। ऑडिओच्या शेवटी शरदचा आवाजही येतो. तो म्हणतोय की मी जोधपूरमध्ये ठीक आहे.”
- “काही लोक आश्रमाच्या लेटरहेडला कॉपी करून खोटे मेसेज पसरवत आहेत. त्यापासून सावध राहा... फक्त लक्ष्मी, नारायण सांई आणि भारतीच माझे कुटुंब आहे, असे म्हणणारे चुकीचे आहेत. अवघे विश्व माझे कुटुंब आहे, यात लाखो-कोट्यवधी सदस्य आहेत. शिल्पीने एम.ए. पर्यँत शिक्षण घेतलेले आहे आणि शरदने एम.टेक. केलेले आहे. त्यांनाही शिक्षा सुनावली. आम्ही कोणताही कट रचला नव्हता. उलट हे केसच एक षडयंत्र आहे.”
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.