आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • आसारामला शिक्षा हा हिंदूंचा अपमान: माजी IPS डी. जी. वंजारा Asharam Guilty Than Follower D G Vanzara Says Insult Of Hindus

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसारामला शिक्षा हा हिंदूंचा अपमान, FIR मध्ये बलात्काराचा उल्लेख नाही: माजी IPS डी. जी. वंजारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - आसारामला जोधपूर कोर्टाने लैंगिक शोषण प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यामुळे आसारामच्या भक्तांमध्ये मोठी निराशा पाहायला मिळत आहे. आसारामला दोषी घोषित केल्यानंतर माजी गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते आसारामचे मोटेरा आश्रम चालवत आहेत. ते माध्यमांना म्हणाले की, हा हिंदूंचा अपमान आहे, बापूंनी बलात्कार केलेला नाही आणि एफआयआरमध्ये असा कोणताही लिखित शब्द नाही.

 

वंजारा म्हणाले- एफआईआरमध्ये बलात्काराची नोंद नाही
वंजारा म्हणाले की, आम्ही जोधपूर कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करतो. आम्हाला कळले आहे की, बलात्कार प्रकरणात बापूजींना दोषी घोषित करण्यात आले आहे. यासंबंधी मी सांगेन की, माझ्याकडे जोधपूरमध्ये नोंदवलेली एफआयआर आहे. असे म्हटले जाऊ शकत नाही की, रेप झाला आहे. पीडितेचा पोलिसांनी 164चा जबाब घेतला. कोर्टातही खटल्यादरम्यान बलात्काराचा कुठेही उल्लेख झालेला नाही.

 

वंजारा आणखी काय म्हणाले पाहा पुढच्या स्लाइडवर..  

बातम्या आणखी आहेत...