आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अहमदाबाद - अल्पवयीन शिष्येवरील बलात्कार प्रकरणात आसाराम (77) ला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अर्थात, त्याचे उर्वरित आयुष्य तुरुंगातच कंठावे लागणार आहे. त्याचे दोन साथीदार शिल्पी आणि शरतचंद्रलाही 20-20 वर्षांची कैद ठोठावण्यात आली आहे. कोर्ट रूममध्ये न्यायाधीशांचा निकाल ऐकून आसाराम आधी रडू लागला, मग म्हणाला, ‘जशी देवाची इच्छा, आम्ही येथेच (जेलमध्ये) राहू.’
चौथे प्रकरण, जेव्हा तुरुंगात कोर्ट बसले...
यापूर्वी विशेष एससी-एसटी कोर्टाचे जज मधुसूदन शर्मा यांनी बुधवारी सकाळी सेंट्रल जेलमध्ये कोर्ट बसवून त्यांना दोषी ठरवले होते. इंदिरा गांधींचे मारेकरी, दहशतवादी अजमल आमिर कसाब आणि डेरा प्रमुख गुरमित राम-रहीम यांच्या केसनंतर देशाचे हे चौथे असे मोठे प्रकरण आहे, जेव्हा तुरंगातच कोर्ट बसले आणि तेथेच निकाल ऐकवण्यात आला. पॉक्सो अॅक्टअंतर्गतही हा सर्वात मोठा निकाल आहे.
जगभरात 400 हून जास्त आश्रम...
- फाळणीच्या वेळी आसारामचे कुटुंब पाकिस्तानातून गुजरातेत आले होते. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बेरानी गावात जन्मलेल्या आसुमल हरपालानीचे वडील थाऊमल कोळसा आणि लाकूड विकायचे.
- आसुमलच्या आसाराम बापू बनण्याच्या प्रवासाला तब्बल 42 वर्षांपूर्वी सुरुवात झाली. तेव्हा गुजराततेत आसुमलला तब्बल 10 एकर सुपीक जमीन मिळाली आणि या जमिनीवरच त्याने आपला पहिला आश्रम बनवला.
- लवकरच त्याने आपले नाव आसाराम बापू ठेवले. आज जगभरात त्याचे 400 हून जास्त आश्रम आणि लाखो भक्त आहेत.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात जन्म
मूळ नाम- आसुमल हरपालानी
चर्चित नाव - संत आसाराम बापू
जन्म-17 एप्रिल 1941
स्थान- सिंध प्रांत (पाकिस्तान)
वडील - थाऊमल सिरुमलानी
आई- मेहनगिबा
पत्नी- लक्ष्मी देवी
मुले- नारायण प्रेम साई (मुलगा), भारती देवी (मुलगी)
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आसारामच्या अहमदाबाद ते अमेरिकेतील आश्रमांचे फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.