आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • पोटच्या मुलीवर रेप केल्याचा आरोप असलेल्या बापाने भरकोर्टात चिरला पत्नीचा गळा Assam Man Accused Of Raping Daughter Kills Wife In Court

पोटच्या मुलीवर रेप केल्याचा आरोप असलेल्या बापाने भरकोर्टात चिरला पत्नीचा गळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाममध्ये मुलीवर रेपच्या आरोपी बापाचे भयंकर कृत्य.
आरोपी बापाने कोर्ट परिसरातच पत्नीचा चिरला गळा.
तब्बल 9 महिने तुरुंगात राहिल्यावर जामिनावर सुटला होता.

 

दिब्रूगड - आसामात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कोर्टात बलात्काराच्या एका प्रकरणावर सुनावणी सुरू होती. यादरम्यान मुलीवर रेप केल्याचा आरोप असलेल्या बापाने कोर्टातच आपल्या पत्नीचा गळा चिरला. रेपचे प्रकरण 9 महिने जुने आहे. पत्नीनेच त्याच्यावर अल्पवयीन मुलीवर रेप केल्याचा आरोप ठेवला होता.

- पोलिसांच्या मते, ही घटना शुक्रवारी दिब्रूगड डिस्ट्रिक्ट सेशन कोर्टात झाली. सप्टेंबर 2017 च्या बलात्काराच्या खटल्याची सुनावणी सुरू होती.
- याप्रकरणी महिलेने आपल्या पतीवरच अल्पवयीन मुलीवर रेप केल्याचा आरोप केला होता. यानंतर आरोपी मागच्या 9 महिन्यांपासून तुरुंगात कैदेत होता.
- आरोपी नुकताच 6 जून रोजी जामिनावर सुटला होता. शुक्रवारी कोर्टात याप्रकरणी सुनावणी होती. त्या वेळी आरोपी आणि कुटुंबातील इतर सदस्य कोर्टात पोहोचले होते.
- आरोपी आणि पत्नी कोर्ट परिसरातील बेंच बसले होते, तेवढ्यात आरोपीने खिशातून चाकू काढला आणि पत्नीचा गळाच चिरला.
- महिला जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाली. यानंतर तिला ताबडतोब आसाम मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, जेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
- हल्ला केल्यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु कोर्टरूममध्ये हजर सिक्युरिटी स्टाफ आणि वकिलांनी त्याला पकडले. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

काय म्हणाला आरोपी?
- अरेस्ट केलेल्या आरोपीचे म्हणणे आहे की, तो निर्दोष आहे. पत्नीने त्याच्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली होती. त्याने सांगितले की, जामिनावर सुटल्यानंतरही पत्नीने त्याला घरात शिरू दिले नव्हते. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...