आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाला- अाता अॅसिड हल्लापीडित, सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्राॅफी, लेप्रसी क्युअर्ड झालेले व ४ फूट १० इंच उंची असलेले उमेदवारही रेल्वेत नाेकरी मिळवू शकतील. दिव्यांगांची समस्या पाहता त्यांनाही रेल्वेत सेवेची संधी मिळावी म्हणून रेल्वे बाेर्डाने दिव्यांगांसाठी असलेल्या नियमांत बदल केला अाहे. त्यासाठी बाेर्डाने दिव्यांगांच्या श्रेणीत पाच इतर वर्गांनाही समाविष्ट केले अाहे. याबाबत अारअारबीने जारी केलेल्या अादेशांतर्गत अाता अॅसिड हल्ल्यातील पीडितांसह ४ फूट १० इंच उंची असलेले बुटके उमेदवारही रेल्वेत नाेकरी करू शकतील. मात्र, त्यासाठी त्यांना चाचणी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
३१ तारखेपर्यंत वाढवली मुदत
अारअारबीने गत ३ फेब्रुवारीला जाहिरात काढून सहायक चालक व तंत्रज्ञ या पदांसाठी अर्ज मागवले हाेते. उत्तर विभागात सहायक चालकाची १,०९८ व एनसीअारमध्ये ८५४, एनअारमध्ये १८३ तंत्रज्ञांची व उत्तर-मध्य रेल्वेत २,५५९ पदांची भरती हाेणार अाहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत पूर्वी ३ मार्च हाेती. ती ३१ मार्च करण्यात अाली अाहे, असे उत्तर विभागाचे सीपीअारअाे नितीन चाैधरी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.